शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

इंडियन सिमलेस अखेर सुरू

By admin | Updated: June 15, 2014 00:32 IST

अहमदनगर: इंडियन सिमलेस कंपनीतील कामगारांवरील बेकारीचे मळब दूर झाले आहे़ कामगार संघटना व व्यवस्थापनात सकारात्मक चर्चा होऊन तिसऱ्या दिवशी शनिवारी तोडगा निघाला

अहमदनगर: इंडियन सिमलेस कंपनीतील कामगारांवरील बेकारीचे मळब दूर झाले आहे़ कामगार संघटना व व्यवस्थापनात सकारात्मक चर्चा होऊन तिसऱ्या दिवशी शनिवारी तोडगा निघाला असून, कंपनीने ट्यूबचे उत्पादन शनिवारी रात्रीच सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन सिमलेस कंपनीने उत्पादन बुधवारपासून बंद केले होते़ कामगार संघटना व व्यवस्थानात वाद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता़ कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे दीड हजार कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता़ कंपनी आवारात बैठक घेऊन कामगारांना दमदाटी करणे, व्यवस्थापनाच्याविरोधात घोषणाबाजी करणे, यासारख्या कारणावरून १२ कामगारांना ताडकाफडकी निलंबत केले होते़ त्यामुळे वादात आणखी भर पडली़ परिणामी कंपनी पुन्हा सुरू होण्याची आशा मावळली होती़ मात्र तिसऱ्या दिवशी शनिवारी सांयकाळी कंपनीच्या आवारात झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आणि कामगारांची एकच जल्लोष करीत कंपनीच्या निर्णयाचे स्वागत केले़ शनिवारीच रात्री बेअरिंगसाठी लागणारी ट्यूब बनविण्याच्या कामास सुरुवात झाली असून, उद्या रविवारपासून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे़ बैठकीस कंपनीचे प्रमुख किशोर फरांदे, संघटनेचे बाबूशेठ टायरवाले आदी उपस्थित होते़कामगारांना ४५०० पगारवाढपगारवाढीची कामगारांची प्रमुख मागणी होती़ यावर बैठकीत चर्चा झाली़ कामगारांचे करार पूर्ण करून कामगारांना ४५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय झाला़ त्यामुळे कामगार कामावर हजर झाले असून, उत्पादनास सुरुवात झाली आहे़ १२ कामगारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे़दोन्ही बाजंूनी सकारात्मक चर्चा झाली़ कामगारांवरील निलंबन मागे घेण्यात आले आहे़ पगारवाढीचाही निर्णय झाला असून, उत्पादन शनिवारी रात्रीपासूनच सुरुवात करण्यात आले आहे़- दिनेश देव, कंपनीचे प्रतिनिधीकामगारांच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत़ बैठकीत याविषयी सकारात्मक निर्णय झाल्याने काम सुरू करण्यास कामगारांनी तयारी दर्शविली आहे़- बाबूशेठ टायरवाले, अध्यक्ष, जिल्हा मजदूर सेना.कंपनी व्यवस्थापन व संघटनेच्या प्रतिनिधींची कंपनीत बैठक झाली़ या बैठकीत सकरात्मक चर्चा होऊन कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे़ कंपनीचे उत्पादनही सुरू झाले आहे़- बाळासाहेब वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त.