श्रीरामपूर : येथील चंद्ररूप डाकले वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अनिल भीमराज महाजन यांनी इंडिया बुक रेकॉर्डमध्ये तीन सुवर्णपदक पटकावले. एशिया ग्रॅण्डमास्टर पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.
महाजन यांनी शीर्षासन अवस्थेत ३० सेकंदात पायांनी १३० टाळ्या वाजवून आसामचे हेमंत काकुट यांचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. १८ प्रकारच्या शिट्या वाजवून दुसरे सुवर्णपदक तर शंख शिट्टी या प्रकारात एक मिनिटात २५७ शिट्या वाजवून तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे.
या यशाबद्दल भारत सरकाराने सुवर्ण प्रशस्ती पत्रक, सुवर्ण पेन आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे ओळखपत्र देऊन गौरविले आहे. इंडिया बुक रेकॉर्डमध्ये दुर्मिळ स्पर्धा प्रकारात तीन सुवर्ण पदकांची हॅटट्रिक केली आहे.
महाजन हे सध्या औरंगाबाद येथे कृषी विभागात काम करत आहेत. यापूर्वीही त्यांनी दुर्मिळ स्पर्धामध्ये विविध पातळ्यांवर यश मिळविले आहे.
------------