पळवे : पिंपळनेर (ता. पारनेर) येथे संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात झाला. यावेळी कोरोनाचे नियम पाळून तालुक्यातील काही बांधव उपस्थित होते. पूजा करुन भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पठारवाडी व पिंपळनेर भजनी मंडळाने भजन सेवा केली. त्याबद्दल भजनी मंडळींचे पारनेर तालुका नाभिक ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पारनेर तालुकाध्यक्ष दादाभाऊ बिडे, माजी अध्यक्ष बबनराव आतकर, कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शामकांत जाधव, उपाध्यक्ष शाम साळुंके, सलून असोसिएशन कार्याध्यक्ष दीपक शिंदे, बाराबलुतेदार अध्यक्ष मनोहर राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कानिफनाथ गायकवाड, विठ्ठल सोनवणे, दत्ता सोनवणे, धनंजय सोनवणे, राम शिंदे, राहुल खंडागळे, नानासाहेब पावडे, विनायक कोरडे, संजय वाघचौरे, माऊली कोरडे, तुकाराम क्षीरसागर, राजू क्षीरसागर, बाळासाहेब भुजबळ, नारायण खंडागळे, दत्तात्रय जाधव आदी बांधव उपस्थित होते. १२ वाजता जन्म सोहळ्यानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली.