शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

गांधींचे मंत्रिपद टांगणीवर!

By admin | Updated: May 27, 2014 00:30 IST

अहमदनगर : गांधी साहेबांच्या मंत्रिपदाचे काही कळले का, कोणते खाते मिळेल हो, त्यांचे नाव बाजूला पडलंय खरंय का? अशा आशयाचे दूरध्वनी भाजपा कार्यालय, गांधींच्या निवासस्थानी

अहमदनगर : गांधी साहेबांच्या मंत्रिपदाचे काही कळले का, कोणते खाते मिळेल हो, त्यांचे नाव बाजूला पडलंय खरंय का? अशा आशयाचे दूरध्वनी भाजपा कार्यालय, गांधींच्या निवासस्थानी आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात दिवसभर येत होते. शहरात, जिल्ह्यात ठिकठिकाणी तशी चर्चाही रंगली होती. दिवसाच्या तिसर्‍या प्रहरापासून गांधींचे नाव वृत्तवाहिन्यांमध्ये झळकेनासे झाले आणि समर्थकांचा उत्साह मावळत गेला. गांधींना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले. मंत्रिपदाचा निर्णय टांगणीला लागल्याने भाजपासमर्थक आणि नगरकरांच्या आनंदोत्सवाला ‘ब्रेक’ लागला. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी सायंकाळी शपथ घेणार असल्याने संपूर्ण देशाचे तिकडे तर नगरकरांचे गांधींच्या मंत्रिपदाकडे लक्ष लागले होते. भाजपा कार्यकर्ते, नेते गेल्या आठ दिवसांपासूनच आनंदात आहेत. कार्यालयासमोर, चौकाचौकात त्यांनी फटाके फोडले. भाजपा कार्यालय परिसरात शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, नगरसेवक सुवेंद्र गांधी, संपत नलावडे आदींनी पेढे वाटून आनंद साजरा केला. एकीकडे मोदींच्या शपथविधीचा आनंद तर दुसरीकडे गांधींना डावलल्याने नाराजी असे संमिश्र वातावरण नगर भाजपामध्ये होते. गांधी हे वाजपेयी सरकारमध्ये जहाज बांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. मागील अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती.(प्रतिनिधी) सभास्थानी रांगोळी नगरमध्ये प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. त्या ठिकाणी आज सडासमार्जन करून रांगोळी काढली होती. रांगोळीतून मोदींचे चित्रही रंगवले होते. कोणी मोबाईलवर मेसेजद्वारे शपथ ग्रहण सोहळ्याचा वेळ सांगत होते तर कोणी काम आटोपून टी.व्ही.समोर जाऊन बसले होते. मात्र, सोहळा सुरू होताच शहरातील अनेक भागातील वीज गायब झाली. मोदींचा शपथ सोहळा नगरकरांना पाहायचा आहे. त्यामुळे भारनियमन करू नका. आता आमचे सरकार आले आहे, हे ध्यानात ठेवा असे आमदार राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांना बजावले होते. स्वकियांचा विरोध? गांधींना मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक नेटाने कामाला लागले होते. गेल्या दोन दिवसांत त्यांची वरिष्ठ पातळीवर मेलामेली सुरू होती. उमेदवारी मिळवतानाही त्यांना अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले होते. अर्बन बँक प्रकरण, त्यांची कार्यपद्धती यावरही काही नेत्यांनी आक्षेप नोंदवला. तशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरू होती. मोदींच्या यंत्रणेने पाठवलेला निवडणुकीतील रिपोर्टही गांधींना डावलण्यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. गांधी समर्थकांना मात्र मंत्रिपद पुढील विस्तारावेळी मिळेल अशी आशा आहे.