दहीगावने : शेवगाव तालुक्यातील दहीगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन होते. नजन म्हणाले, लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा त्याच कार्यशैलीत पुढे चालविणारे घुले बंधू समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळ व मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्था नवनवीन उपक्रम राबवत असते. गोरगरिबांच्या पाल्यांच्या भविष्याला उंची प्राप्त करून देण्यासाठी संस्था बांधील आहे. गणवेश वाटपाच्या कार्यक्रमानंतर क्रीडा संकुल परिसरात नारळ, सप्तपर्णी झाडांचे वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक गणपत कणसे, उपप्राचार्य उषा नरवडे, प्रा. संतोष आडकित्ते, बापूसाहेब लोढे, विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र पानकर, मीरा बेल्हेकर यांनी केले. प्रा. मकरंद बारगुजे यांनी आभार मानले. रांजणी येथेही नरेंद्र घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
---
१९ दहीगावने
शेवगाव तालुक्यातील दहीगावने येथे माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले.