शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

लॉकडाऊनमध्ये पोस्टाकडून ग्राहकांना आर्थिक हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

चंद्रकांत शेळके लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात बँका, एटीएम बंद असताना तसेच बाहेर पडण्यास बंधने असताना पोस्ट ...

चंद्रकांत शेळके

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात बँका, एटीएम बंद असताना तसेच बाहेर पडण्यास बंधने असताना पोस्ट बँकेकडून ग्राहकांना आर्थिक हातभार देण्यात आला. या काळात नगर जिल्ह्यात पोस्ट बँकेने २५ हजार ग्राहकांना तब्बल सव्वासहा कोटींचे घरपोच वाटप केले.

सर्वसामान्य ग्राहकांचे व्यवहार बहुदा पोस्ट विभागाशी जोडलेले आहेत. विश्वासार्ह सेवा, पारदर्शकता आणि घरपोच सेवेमुळे ग्राहक पोस्ट विभागात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट विभागाचे देशभरात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि सेविंग बँक अशा दोन भागांत आर्थिक व्यवहार चालतात.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणसांना घराबाहेर पडण्यास बंधने होती, अशा अडचणीच्या काळात अहमदनगर विभागात २५ हजार ग्राहकांना पोस्टमनदादांनी घरपोच जाऊन पैसे दिले. यामध्ये वयोवृद्ध, पेन्शनधारक तसेच इतर कामगारवर्गाचा समावेश होता. ही रक्कम ६ कोटी २५ लाख १६ हजार ४३४ एवढी आहे. यासाठी ग्रामीण भागात ३०९ तर शहरात ६७ अशा एकूण ३७६ पोस्टमनने ही सेवा बजावली.

-----------------

लॉकडाऊनमध्ये पोस्ट बँकेकडून घरपोहोच वाटप - ६ कोटी २५ लाख

ग्राहकांना लाभ - २५६३८

एवढ्या पोस्टमनने बजावली सेवा - ३७६

------------------

औषधींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोनाकाळात पोस्ट विभागाकडून अत्यावश्यक सेवा वस्तू तसेच औषधीचे वाटप करण्यात आले. याशिवाय इतर पार्सल, मनीऑर्डर तसेच पोस्टव्यतिरिक्त इतर बँकेत खाते असलेल्या लोकांनाही आधारकार्डच्या आधारे थम्ब घेऊन पैसे दिले गेले.

-------------

३३५१ विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप खाते

लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ३३५१ विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपसाठी पोस्ट बँकेत खाते उघडले.

--------------

पोस्टाच्या विश्‍वासार्ह सेवेमुळे सामान्य लोकांचा पोस्टावर विश्वास आहेच. परंतु, लॉकडाऊनमध्ये पोस्ट विभागाने विशेष सेवा दिल्याने हा विश्वास आणखीनच वाढला आहे.

- जे. टी. भोसले, वरिष्ठ डाक अधीक्षक, नगर विभाग