शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
2
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
3
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
4
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
5
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
6
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
7
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
8
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
9
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
10
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
11
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
12
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
13
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
14
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
15
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
16
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
17
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
19
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
20
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

चाऱ्याचा काटा मारल्यास पाच रुपये दंड

By admin | Updated: June 2, 2016 23:08 IST

अहमदनगर : जनावरांना नियमापेक्षा कमी चारा दिल्याचे आढळून आल्यास प्रति दिनी प्रति जनावर, याप्रमाणे पाच रुपये दंड आकारला जाणार आहे़

अहमदनगर : जनावरांच्या चारा छावण्यांसाठीचे दंड जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले असून, जनावरांना नियमापेक्षा कमी चारा दिल्याचे आढळून आल्यास प्रति दिनी प्रति जनावर, याप्रमाणे पाच रुपये दंड आकारला जाणार आहे़ प्रांत अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येणार आहे़जिल्ह्यात ३५ छावण्या सुरू आहेत़ छावण्या सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत़ छावण्यांकडून अनुदानाचीही मागणी करण्यात येत आहे़ पण, छावणी चालकांकडून सरकारचे नियम धाब्यावर बसविले जात असलयाचे प्रशासनाच्या निदर्शनास आले़ त्यामुळे प्रशासनाने सावध भूमिका घेत छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला़ दंड प्रति दिन प्रति जनावरे, या प्रमाणे आकारण्यात येणार आहे़ तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या नायब तहसीलदारांचे पत्र न घेता जनावरे छावणीत दाखल करून घेण्याचे प्रकार घडले आहेत़ प्रशासनाला न विचारता जनावरे दाखल करून घेणाऱ्या छावण्यांना प्रति दिन दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे़ नियमानुसार लहान व मोठ्या जनवारांना चारा न दिल्यास अनुदानातून प्रति दिन प्रती जनावर पाच रुपये, नोंद न ठेवल्यास पाच रुपये, निवाऱ्यांची व्यवस्था न केल्यास मोठे जनावर पाच रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रति दिनी दोन रुपये ५० पैसे दंड अकारण्यात येणार आहे़ छावण्यांची तपासणी करण्याचे आदेश तहसीलदारांना मध्यंतरी देण्यात आले होते़ मात्र अवघ्या सात छावण्यांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे छावण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्रांतांना देण्यात आले असून, दंडात्मक कारवाया करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़