शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी वेगळा नियम व नगर तालुका आणि अकोले तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवण्यात आला आहे. या नियमाचा फटका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहणार आहेत. नगर तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार व ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.राज्य सरकारने हवामानावर आधारित विमा योजनेसाठी विभागातून एक याप्रमाणे पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यासाठी धान्य पिकांमध्ये हरबरा व ज्वारी यांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी पीक विमा रक्कम भरत नोंदणी केली आहे. पण जनरल इंशुरन्स कंपनीने जिल्ह्यात वेगवेगळे नियम ठेवले आहेत. नगर तालुका व अकोले तालुका यांच्यासाठी तापमानाची अट किमान ७ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान गेल्यास विम्यास पात्र अशी अट ठेवली आहे, तर इतर अकरा तालुक्यांसाठी किमान ११ डिग्री सेल्सिअसच्या खाली विम्यास पात्र अशी अट ठेवण्यात आली आहे.नगर तालुक्याचे तापमान गेल्या कित्येक वर्षात ७ डिग्री पेक्षा कमी गेलेले नाही. यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी या अटीनुसार विम्यास पात्र होणार नाहीत. नगर तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यांना वेगळा नियम व नगर तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवत कंपनी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर विम्याबाबत अन्याय करीत आहेत. विशेष म्हणजे नगर तालुक्यासाठी १० डिग्री तापमानाची शिफारस राहुरी कृषी विद्यापीठाने शासनाकडे व कंपनीकडे केली असताना कंपनी मनमानी करत आहे. या कंपनीच्या अन्यायी धोरणाच्या विरोधात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.(प्रतिनिधी) शेतकरी आभारही मानत नाहीतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मी खस्ता खाल्ल्या. शेतकऱ्यांना मागील वर्षी मोठा प्रयत्न करून ३८ कोटी ५० लाखांचा लाभ मिळवून दिला. यापूर्वीही तीन-चार वर्षांपासून मी पीक विम्यासाठी संघर्ष करीत आहे. पण तालुक्यातील शेतकरी साधे आभार मानायला सुद्धा माझ्याकडे फिरकले नाहीत, अशी खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली.तालुक्यातील पुढाऱ्यांना यात रस नाहीनगर जिल्ह्यातीलच काय पण नगर तालुक्यातील पुढाऱ्यांना व जिल्हा बँकेलाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यात रस नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी फक्त मला शिव्या शाप देण्याचेच काम करतात. पण शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी त्यांचे योगदान नाही, मुळात त्यांना विम्यातले काही कळत नाही अशी टीका शेळके यांनी केली. विमा मिळाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यात सगळे पुढे पळतात असेही शेळके म्हणाले.