राशीन : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. पोलिसांच्या अतिरिक्त कामाचे स्वरूप वाढले आहे. त्याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांना माजी सैनिकांनी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यातील माजी सैनिक व पोलीस निरीक्षक यादव यांच्यामध्ये बैठक पार पडली. यावेळी पोलिसांना माजी सैनिकांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार माजी सैनिक भाऊसाहेब रानमाळ, मिलिंद रेणुके, अरुण भिताडे, छगन सूळ, जमाल काझी, विनोद कदम, सुधीर करपे, दीपक लांडगे, अंकुश म्हस्के, जालिंदर जमदाडे, राजू तोरडमल, प्रकाश थोरात, भाऊसाहेब आगवण, दत्तात्रय शेळके, दत्तात्रय शिंदे हे गेल्या १० दिवसांपासून कर्जत पोलिसांना कर्जत, राशीन तसेच मिरजगाव येथे नाका-बंदी पेट्रोलिंग कामी मदत करत आहेत.
कोरोना काळात माजी सैनिकांची पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST