ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर या महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
लस घेण्यासाठी सकाळपासून श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. पहिली लस ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय लोखंडे यांनी घेतली.
देवदैठण उपकेंद्राच्या आरोग्य सेविका जयश्री सरोदे, सुनीता यादव, जयश्री पवार यांनी लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी डॉ. जयदेवी राजेकर, पर्यवेक्षक दीपक गोधडे, प्रशांत सहस्त्रबुध्दे, शिवाजी गायकवाड, मदतनीस राधा ढोबळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी लसीकरण प्रक्रियेत मदत केली.
फोटो - देवदैठण
ओळी : लसीकरणास प्रारंभ करताना कोमल वाखारे, कल्याणी लोखंडे, जयश्री गुंजाळ, पूजा बनकर या माहिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.