जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांशी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचाच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. कुटुंबातील मालमत्ताधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यानंतर संपत्तीच्या वाटणीवरून वारसांमध्ये बहुतांशी वेळेस वाद उद्भवतात. काही वेळेस वडिलांच्या नावावर किती संपत्ती होती याचीही माहिती त्यांच्या वारसांना नसते. मृत्यूनंतर पुढे निर्माण होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी बहुतांशी जणांनी हयात असतानाच नोटरी अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्राची नोंदणी केली आहेत तर अनेक जण मृत्युपत्र व हक्कसोडबाबत चौकशी करत असल्याचे नोटरी पब्लिक यांनी सांगितले.
...............
वारसांच्या काळजीपोटी मृत्युपत्र
संपत्तीला अनेक वारसदार असतात तेव्हा कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर मालमत्ता हस्तांतरासह इतर अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या पश्चात संपत्तीच्या वाटण्या कशा व्हाव्यात, त्याचे आधीच योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी अनेक जण मृत्युपत्राचा आधार घेत आहेत. यामध्ये वकिलांमार्फत केल्या जाणाऱ्या रजिस्टर मृत्युपत्रासह स्वत: पेपरवर मृत्युपत्र लिहीत आहेत.
........
ग्रामीण भागात प्रमाण कमी
मृत्युपत्र तयार करणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरात जास्त आहे. शहरातही नोकरदार, व्यावसायिक या क्षेत्रातील लोक सर्वाधिक जास्त मृत्युपत्र तयार करून घेत आहेत.
..........
गेल्या काही दिवसांत मृत्युपत्र तयार करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. बहुतांशी जण मृत्यू पत्राबाबत कायदेशीर प्रक्रियेची माहितीही घेत आहेत. नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त अणखी कोणाला संपत्ती द्यायची असल्यास मृत्युपत्राचे महत्त्व अधिक असते. मृत्युपत्र साध्या कागदावर केले जाऊ शकते. मात्र, कुणी शंका घेऊ नये म्हणून कायदेशीर प्रक्रियाप्रमाणे नोटरी अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्राची नोंद केली जाते.
- ॲड. श्यामराव केकान, नोटरी
..........
कुटुंबप्रमुखाचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांशी वेळा संपत्तीबाबत त्याचे कुटुंबीयही अनभिज्ञ असतात. अशा वेळी संपत्तीवर दावे-प्रतिदावे होतात. त्यामुळे मृत्युपत्र करून घेणे गरजेचे आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांचे ग्रामीण भागात प्रमाण खूप कमी आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
- ॲड. शेखर दरंदले, नोटरी
-
डमी आहे