अहमदनगर: वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. खंडित वीज पुरवठ्याने नियमित पाणी उपसा होत नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. नगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तेथील मोटारीसाठी नगरच्या एमआयडीसीतून वीज पुरवठा होतो. वीजवाहक तारा अनेक दिवसांच्या तसेच कमी क्षमतेच्या असल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होतो. बुधवार व गुरूवार दोन दिवस तांत्रिक बिघाड झाल्याने मुळानगर, विळद व नागापूर येथील पंपिंग स्टेशनवरील पाणी उपसा बंद झाला. पर्यायाने शहरातील पाणी वितरणाच्या टाक्या भरल्याच नाहीत. त्यामुळे नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. बिघाड दुरूस्तीसाठी महावितरण व महापालिकेचे अधिकाऱ्यांचे काम सुरू आहे. तोपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST