दरवर्षी २० ते २२ डिसेंबरदरम्यान अहमदनगर महाविद्यालयात चॅपल (चर्च)मध्ये नाताळ साजरा करण्यात येतो आणि यानंतर महाविद्यालयात सुटी जाहीर होते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद असल्याने यंदाचा नाताळ उत्सव हा महाविद्यालयात साजरा होईल की नाही, याबाबत संभ्रम होता; परंतु उत्साही विद्यार्थी आणि शिक्षकांनी मागील काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. आवश्यकतेनुसार भव्य सेट तयार करण्यात आले. चर्चला रोशनाई केली व विविध विद्यार्थ्यांच्या ग्रुप साँगने धमाल करीत हा सण साजरा केला.
कार्यक्रमाचे प्रसारण २० डिसेंबर रोजी यू-ट्यूब प्रीमिअरवर करण्यात आले. प्राचार्य डॉ. बार्नबस म्हणाले, विविध सण, उत्सव ही आपली संस्कृती आहे. सध्या कोरोनामुळे महाविद्यालय जरी बंद असले तरी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी नाताळ सणात खंड पडू न देता ‘शो मस्ट गो ऑन’ याप्रमाणे मोठ्या दिमाखात साजरा केला. विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
यासाठी प्रा. फिलिख अब्राहम, अरुण बळीद, विनय रननवरे, सुजाता लोंढे, उज्ज्वला गायकवाड, श्रद्धा त्रिभुवन, सानिका जाधव, प्रा. प्रतुल कासाटे, प्रा. गौरव मिसाळ आदींनी परिश्रम घेतले.
------
फोटो मेल - नगर कॉलेज
अहमदनगर महाविद्यालयात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या ग्रुप साँगने धमाल केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस व शिक्षकवृंद.