नान्नज : जवळा (ता. जामखेड) येथील नांदनी नदी, मुंजेवाडी पाझर तलावाचे खोलीकरण, रूंदीकरण करावे. जवळा गावात ८ साखळी बंधारे उभारावेत, अशा मागणीचे निवेदन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना युवा सेना जामखेड तालुका प्रमुख सावता हजारे यांच्यासह ग्रामस्थांनी दिले.
मंत्री गडाख यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यात घोंगडी बैठका घेतल्या. जवळा येथे सावता हजारे यांच्या निवासस्थानी घोंगडी बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांशी गडाख यांनी चर्चा केली.
यावेळी हजारे म्हणाले, आमच्या भागातील शेतकरी दूध व्यवसाय जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे याच भागात दूध प्रक्रिया उद्योग सुरू व्हायला हवा. यावेळी गडाख म्हणाले, दूध व्यवसायासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत मुंबई येथे आयोजित बैठकीत आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद, सरपंच प्रशांत शिंदे, माजी उपसभापती दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत, अंगद मुळे, दयानंद कथले, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, राहुल पाटील, सुशील आव्हाड, किरण हजारे, प्रदीप हजारे, श्रीकांत चव्हाण, उमेश हजारे, डॉ. ईश्वर हजारे, पांडुरंग शेळके, गणेश चव्हाण, दादा डफळ, सचिन विटकर, मारुती गोरे, अनिल हजारे, अशोक हजारे आदी उपस्थित होते.
----
११ नान्नज
जवळा येथे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा सावता हजारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सन्मान केला.