शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

भैय्या आले अन् दाखले दिले...

By admin | Updated: June 26, 2014 00:46 IST

अहमदनगर : कुणाच्या दोन महिन्यापासून चकरा, कुणाच्या चेहऱ्यावर उद्याचे अ‍ॅडमिशन जाण्याची भीती, सकाळपासून महा ईसेवाच्या दारात ताटकळलेले, बायाबापडे रडकुंडीला आलेले...

अहमदनगर : कुणाच्या दोन महिन्यापासून चकरा, कुणाच्या चेहऱ्यावर उद्याचे अ‍ॅडमिशन जाण्याची भीती, सकाळपासून महा ईसेवाच्या दारात ताटकळलेले, बायाबापडे रडकुंडीला आलेले... सर्वांनीच महा ई-सेवा नावाच्या सरकारी यंत्रणेपुढे हात टेकलेले...एवढ्यात कुणीतरी ओरडले भैय्या आले, काय चमत्कार केंद्रचालकाने इतक्या दिवस दडवून ठेवलेले दाखले पटापट खिडकीतून बाहेर येऊ लागले... सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भरते आले...महा ई सेवा केंद्रात वेळेवर दाखलेच मिळत नाहीत. पालक-विद्यार्थ्यांना कित्येकदा चकरा माराव्या लागतात. अख्खा दिवस दाखल्यासाठी वाया जातो. ही अवस्था आमदार अनिल राठोड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी संभाजी कदम, विक्रम राठोड यांच्यासह तहसील कचेरीवर धडक मारली. अन् महा-ई सेवा केंद्रात घुसून दाखले वाटप करायला भाग पाडले. विद्यार्थ्यांचा महाविद्यालय प्रवेश सुरू आहे. तेथे दाखल्याशिवाय पान हलत नाही आणि महा ई सेवावाले पैसे घेतल्याशिवाय दाखले देत नाहीत. ही बाब ‘लोकमत’ने गेल्या महिन्यापासून वृत्ताद्वारे उजेडात आणली. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलचे उपजिल्हाधिकारी बोरूडे यांना बोलावून दाखल्यांचा आॅफलाईन निपटारा करण्याचा आदेश दिला, पण कसले काय सर्व जैसे थे. आमदार राठोड कार्यालयात आल्याचे समजल्यावर मग तहसीलदार पवार आले. आमदारांनी कानउघडणी केल्यावर बघतो, केंद्रचालक लांगोरे यांच्यावर एफआयआरच दाखल करतो, असे सांगून तहसीलदारसाहेबांनी वेळ मारून नेली.आमदार राठोड यांचे यावरही समाधान झाले नाही. त्यांनी थेट केंद्रात जाऊन दाखले हातात घेतले. भैय्या आमचे प्रकरण लई दिवसांपासून पडून तुमी सांगीतलं तर काम होईल. काहींची रडारड, आणि दाखले मिळवण्यासाठी एकच गर्दी उसळली. जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूलगावात ठिकठिकाणी महा ई सेवा केंद्र दिली आहेत. मात्र, लोकांना तहसीलजवळच्या केंद्रात जायची सवय लागल्याने तिकडे जातात. त्यामुळे त्याच्यावर लोड येतो. वस्तुस्थिती वेगळी आहे. इतर केंद्रचालक ठराविकच दाखले स्वीकारतात. उर्वरित दाखले तहसीलजवळील केंद्रात नेण्याचा सल्ला देतात. संबंधित सेतूचालकालाही हेच हवे आहे. काम झाले नाही की लोक जास्तीचे पैसे देतात. वरच्या साहेबांची मर्जी राखली की काम भागते. हे गौडबंगाल जिल्हाधिकाऱ्यांना माहिती नाही.