खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यासाठी कोरोना टेस्ट व ई-पास आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक सध्या प्रवास करत आहेत. प्रवास करणारे बहुतांश जण स्वतःच्या वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे नगरमधून ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य आहे. इतर शहरांत नगरमार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्याही पहिल्या तुलनेत अवघी चार ते पाच टक्के एवढी आहे. नगरमधून दिवसभरात अवघ्या दोन ते तीन ट्रॅव्हल्स जातात तर रात्री तीन ते चार. यातील एक ते दोन ट्रॅव्हल्स नगरमधून प्रवासी घेतात. सध्या नगरमधील अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालय बंद आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या आधी महाराष्ट्रासह परराज्यातून नगरमार्गे शिर्डी व शनिशिंगणापूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी. सध्या धार्मिक स्थळे बंद असल्याने या ट्रॅव्हल्स बंद झाल्या आहेत.
.........
चौकात ट्रॅव्हल्सची तपासणी
नगर शहरात डीएसपी चौकात दररोज पोलिसांकडून इतर वाहनांसह ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...........
सध्या नगर शहरातून जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या नगण्य आहे. या ट्रॅव्हल्सची सध्या नियमित तपासणी केली जाते. ट्रॅव्हल्समधून प्रवास करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
- विकास देवरे, वाहतूक निरीक्षक, नगर शहर
..........
कोरोनामुळे सध्या प्रवासी नसल्याने ट्रॅव्हल व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रवाशांची बुकिंग मिळाली तरच ट्रॅव्हल चालविली जाते. प्रवासी घेताना शासनाच्या नियमांचे पालन केले जाते.
- श्रीकांत गोरडे, ट्रॅव्हल व्यावसायिक
.............