शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

चितळे रस्त्यावर धनुष्य-घड्याळाची टक्कर

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

अहमदनगर : चितळे रोड म्हणजे शिवसेनेचा किल्लाच! या रस्त्यावर माजी आमदार अनिल राठोड यांचे एकहाती वर्चस्व!

अहमदनगर : चितळे रोड म्हणजे शिवसेनेचा किल्लाच! या रस्त्यावर माजी आमदार अनिल राठोड यांचे एकहाती वर्चस्व! नेता सुभाष चौकात शिवसेनेचे कार्यालय असल्याने गेल्या २५ वर्षातील शिवसेनेच्या राजकीय घडामोडींचा हा रस्ता एक साक्षीदारच म्हणावा लागेल. शिवसेना आणि चितळे रस्ता म्हणजे एक समीकरण झाले होते. मात्र ही परंपरा आता मोडीत निघणार आहे. कारण आता याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू होत असल्याने आगामी काळातील राजकीय संघर्ष चांगलाच रंगणार आहे.राजकीय वाद असोत की आनंदाचे मेळावे, त्याची चितळे रोडवरूनच सुरवात होते. त्यामुळे शिवसेना आणि चितळे रोड हे एक समीकरणच बनले होते. गेल्या २५ वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाच्या मनात या रस्त्यावर कार्यालय थाटण्याचा विचार आला नाही. मात्र लोकसंपर्कासाठी चितळे रोडशिवाय दुसरा चांगला रस्ता कोणताही नाही, याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना आली असावी. त्यांनी नेहरु मार्केटच्या बाजुला जनसंपर्क कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या कार्यालयाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. वेळ मिळाल्यास दणक्यात या कार्यालयाचे उद्घाटन होईल. पूर्वी शिवसेनेत काम करणारे संजय झिंजे, दीपक सूळ, अंबादास पंधाडे असे कितीतरी कार्यकर्ते सध्या जगताप यांच्या तंबूत आहे. त्यांच्या मदतीनेच ही कार्यालयाची संकल्पना साकार झाली. आगामी विधानसभेची जोरदार तयारी करण्यासाठी त्यांनी हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले, यात शंकाच नाही. मात्र त्यांच्या कार्यालयामुळे आता चितळे रोडवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. दोन्ही पारंपरिक विरोधकांची कार्यालये एकाच रस्त्यावर आल्याने राजकीय संघर्ष धगधगता राहणार आहे.चितळे रोडवर नवीन कार्यालयाचे काम सध्या सुरू आहे. एक-दोन दिवसात कार्यालयाचे काम पूर्ण होईल. अधिवेशन काळात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची वेळ मिळाली तर त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. चितळे रोड हा मध्यवर्ती भाग असल्याने लोकांच्या सोयीसाठी चितळे रोडवर संपर्क कार्यालय सुरू केले आहे. लोकप्रतिनिधीला भेटणे लोकांना सोपे व्हावे, हाच उद्देश कार्यालय सुरू करण्यामागे आहे.- संग्राम जगताप, आमदार