शेवगाव : शेवगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाचा निषेध नोंदवित सोमवारी सकाळी मुंडन आंदोलन करण्यात आले.
शहरवासियांना कमी वेळ व कमी दाबाने दहा ते बारा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले.
वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ता किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, ‘भाकप’चे संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी किसन चव्हाण म्हणाले, पालिकेतील मिलबाटके खाणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीला आता जनताच योग्य धडा शिकवेल. टक्केवारी, घराणेशाही, पाणीपट्टी वसुली या मुद्द्यावर सत्ताधारी, विरोधकांना चव्हाण यांनी चांगलेच घेरले.
आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, कामगार संघटनेचे रमेश खरात, राजू इंगळे, सलीम हिरानी, विशाल इंगळे, अन्सार कुरेशी, लखन घोडेराव, लक्ष्मण मोरे, विश्वास हिवाळे, रतन मगर, भीमा गायकवाड, अशोक गायकवाड, रेश्मा गायकवाड, पोशान्ना किडमिंचे, विठ्ठल गायकवाड, राजू शेख, करण मोरे, आन्नापा गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो : २१ शेवगाव १
शेवगाव येथे वंचितच्या वतीने आंदाेलन करण्यात आले.