श्रीगोंदा : तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्या संबंधीत व्यक्तीने धमकी देत नऊ महिने पिडीत महिलेवर अत्याचार केला आहे.
पीडित मुलीने रविवारी (दि.१३) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून रामदास मोरे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोक्सो, बलात्कार, विनयभंग अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला. रामदास मोरे हा फरार आहे.
रामदास मोरे याने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मोरे पीडित मुलीवर अत्याचार करत असे. मागील नऊ महिन्यांपासून त्याने पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. अखेर पीडितीने श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून रामदास मोरे विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.