अहमदनगर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
पुणे महामार्गावरील जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, संदेश कार्ले, मदन आढाव, अमोल येवले, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश बोरूडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, शरद झोडगे, संजय आव्हाड, महिला आघाडीच्या आशाताई निंबाळकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची अवाजवी दरवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. कोरोनाच्या संकटातून सावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात विष कालवण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये इंधन दरवाढीचा भाव ५० टक्के होऊन खाली कोसळला आहे. असे असताना भारतात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचे असल्याचे दिलीप सातपुते यांनी यावेळी सांगितले.
....
सूचना फोटो: ५ शिवसेना नावाने आहे
फोटो ओळी : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडीतून काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व शहर प्रमुख दिलीप सातपुते. समवेत संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, संदेश कार्ले, मदन आढाव, अमोल येवले, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश बोरूडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, शरद झोडगे, संजय आव्हाड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर आदी