या स्पर्धेच्या माध्यमातून एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर करून याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, संतोष एडके आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीवर आकर्षक पोस्टर रंगविले तर निबंधातून हा आजार हद्दपार करण्यासाठी विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना हा आजार एकत्र वावरल्याने, बोलण्यातून, हस्तांदोलनातून, एकत्र सहवासातून होत नसून, याचा संसर्ग असुरक्षित संबंधातून, बाधित मातेकडून बालकाला, दूषित रक्त संक्रमणातून होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.रंगनाथ सुंबे यांनी केले.
फोटो २८ जनजागृती
ओळी- चास येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा. रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, संदीप डोंगरे आदी.