छकुल्या ऊर्फ सतीश रावसाहेब बोरुडे, मोईन अमीर शेख व सीमा रावसाहेब बोरुडे (सर्व रा. डिग्रस, ता. राहुरी), असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. छकुल्या बोरुडे व त्याच्या साथीदारांनी १५ एप्रिल रोजी रोहित कचरू लांडगे या तरुणास त्याच्या घरी येऊन मारहाण केली होती. या घटनेनंतर १६ एप्रिल रोजी रोहितने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मयत रोहितची आई शिवाबाई कचरू लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर छकुल्या बोरुडे व त्याचे साथीदार पसार झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST