राहुरी : रायगड जिल्ह्यातील तीन हजार फूट उंचीवर असलेला लिंगाणा किल्ला राहुरी व नगरच्या २५ पर्यटकांनी रविवारी यशस्वीरीत्या सर केला. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर पर्यटकांनी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावून जल्लोष केला.
इंद्रप्रस्थ ट्रेकर्सचे प्रमुख अनिल वाघ, वैभव लोटके यांच्या नेतृत्वाखाली हौशी २५ पर्यटकांनी लिंगाणा किल्ला यशस्वीरीत्या सर केला.
समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच असलेला लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहक प्रेमींनी रोप, रॅपर, कॅप, हॅण्ड ग्लोज, शूज आधी साहित्याचा वापर करण्यात आला. रविवारी पहाटे ५ वाजता किल्ला चढण्यास सुरुवात केली. तर दुपारी दीड वाजता तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला यशस्वीरीत्या सर केला. किल्ला सर केल्यानंतर पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माता की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.. अशा जयघोष करत पर्यटकांनी किल्ल्यावर भगवा फडकवला.
गड सर करण्यासाठी अनिल वाघ, वैभव लाटे, स्नेहल रायभान, प्रवीण पवार, महेश जाधव, अमोल हिंगे, सोमनाथ आघाव, प्रथमेश ढेरे, बाबासाहेब शिरसागर, मीना येवले, मनीषा काकडे, स्वप्नाली येवले, ऋषिकेश येवले, धनंजय लहारे यांच्यासह २६ जणांनी लिंगाणा किल्ला यशस्वीरीत्या सर केला.
त्यामध्ये ज्येष्ठ योग शिक्षिका मीना येवले (वय ५७) यांनी किल्ला यशस्वीरीत्या सर केला. याबद्दल त्यांचे कौतुक केले.
...
लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी रोप, रॅप, कॅप, हॅण्ड-ग्लोज, शूज आदी साहित्य पर्यटकांना किल्ला सर करतेवेळी देण्यात आले होते. नगर व राहुरी मधील पहिल्यांदाच २५ जणांनी किल्ला यशस्वीरीत्या सर केला.
- अनिल वाघ,
इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुप, अहमदनगर.
...