शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

१९० टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: May 27, 2014 00:29 IST

अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे.

अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे. या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार जनतेची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा नगर, पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यात बसतांना दिसत आहे. या ठिकाणी ४० ते ६६ हजार जनतेला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाला अद्याप सुमारे १३ ते १४ दिवसांचा कालावधी असल्याने टँकरचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाईवर लक्ष ठेवून असून ज्या ज्या ठिकाणी मागणी होत आहे, त्या ठिकाणी तातडीने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुकनिहाय टँकरने पाणी पिणारी जनता: संगमनेर ४८ हजार २८८, अकोले ३ हजार ६२१, कोपरगाव १५ हजार ३१५, नेवासा ७ हजार ३७८, राहाता ७ हजार ७५६, नगर ६६ हजार ९९, पारनेर २८ हजार ८६१, पाथर्डी ६३ हजार ४०९, शेवगाव २३ हजार ५७२, कर्जत ३८ हजार ३४३, जामखेड ३० हजार ९१७, श्रीगोंदा २ हजार ६३८ असा आहे. श्रीरामपुर, राहुरी तालुका पाणी टंचाईपासून वाचलेला आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. जिल्ह्यात १४४ गावे आणि ५८९ वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून त्या ठिकाणी १९० टँकर सुरू आहेत.