जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी राहाता येथील जिल्हा परिषद शाळेत शांततेत मतदान पार पडले.
सकाळपासून राहाता येथील मतदान केंद्रावर मोठी चुरस पाहायला मिळत होती. खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदनाना सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, कैलास बापू कोते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सुनील सदाफळ, डॉ. के. वाय. गाडेकर उपस्थीत होते. राऊसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, सुरेश थोरात, महेंद्र शेळके, बाबासाहेब कोते आदी यावेळी उपस्थीत होते.
राहाता मतदान केंद्रावर १३९ मतदारांपैकी १३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उर्वरीत आठ मतदारांपैकी ३ मतदार मयत असून पाच मतदार आजारी असल्याने ते मतदानास येवू शकले नाही.