शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

झेन कथा - आरशात ‘काय’ दिसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 02:34 IST

प्रेरणादायी कथा

धनंजय जोशी

प्रत्येक अनुभवामागे एक अंतर्गत ज्ञान असते.. त्याला इंग्लिश शब्द आहे इनसाइट ! ह्या ज्ञानाचे वेगळे पैलू दिसले किंवा वेगळे आहेत असे वाटले तरी खरी गोष्ट म्हणजे ते प्रत्यक्षात वेगळे नसतातच मुळी ! साधे उदाहरण. बुद्धाने सांगितले, ‘एव्हरीथिंग इज इम्पर्मनन्ट - सर्व काही सारखे बदलत आहे!’ बुद्धाने असेही सांगितले, ‘सी थिंग्स इन देअर ट्रू नेचर - सर्व काही सत्य स्वरूप आहे.’- सान सा निम यांना त्यांच्या एका शिष्याने विचारले, ‘हे कसे असू शकेल? सगळे नित्य बदलणारे आणि तरीही सगळे सत्यपण?’ सान सा निम यांनी त्याला फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘तू घरी जा आणि तुझ्या बाथरूममधल्या आरश्याकडे बघ. तो जसा आहे तसाच आहे - रिकामा. म्हणजे त्या आरशामध्ये काहीही नाही. मग तू एक तांबडा चेंडू त्याच्यासमोर धर. काय दिसेल? एक तांबडा चेंडू दिसेल. मग एक पांढरा चेंडू आरश्यासमोर धर. काय दिसेल? एक पांढरा चेंडू दिसेल. एक पाण्याचे भांडे त्याच्यासमोर धर- एक पाण्याचे भांडे दिसेल. या गोष्टी बाजूला केल्यावर काय दिसेल? - काहीही नाही. म्हणजे तो आरसा स्वत:साठी काहीही ठेवत नाही. तो जसा रिकामा असतो तसाच तो राहतो. कोणी त्याच्या समोर आले तर तो फक्त त्याचेच दर्शन घडवतो. याचाच अर्थ, आरसा कशाचाही हव्यास किंवा कशाचीही अडचण न बाळगता जे आहे तसे दाखवतो. समोर आलेल्या गोष्टी बदलत गेल्या, तरी त्यामागे जो आरसा आहे तो मुक्त म्हणजे सत्यच आहे की नाही?’

आपली मने त्या आरश्यासारखी निर्मळ राहू शकत नाहीत. तांबडा चेंडू आपल्या मनातून जाऊन दुसरा चेंडू पुढे आणला तरी आपल्या मनातले त्या तांबड्या चेंडूबद्दलचे विचार थांबत नाहीत. आपण म्हणत राहतो, ‘अरे, तो तांबडा चेंडू जरा बरा होता, हलका होता. मला तो जास्त आवडला. पांढरा ठीक होता पण...’- आपल्या मनो-आरश्याचे असे खेळ कायम चालू असतात.ते समजून येणे म्हणजेच ‘इनसाइट’ किंवा अंतर्गत ज्ञान!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक