शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Lunar Eclipse 2018: धर्मातील श्रद्धा Vs. वैज्ञानिक दृष्टिकोन... तुम्हीच ठरवा काय योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 18:58 IST

Lunar Eclipse 2018: 'ग्रहण पाहू नये म्हणतात', असं मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी हा विषय येतो आणि त्यावरून वादही होतात.

मुंबईः शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आज रात्री १०.४५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं आहे. सुमारे एक तास चंद्राची खग्रास अवस्था पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण त्याचवेळी, 'ग्रहण पाहू नये म्हणतात', असं मानणाराही मोठा वर्ग आहे. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी हा विषय येतोच आणि त्यावरून वादही होतात. म्हणूनच ग्रहणाबाबत धर्मातील श्रद्धा काय आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा कसा विचार केला जातो, या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. त्यातून तुम्हाला काय पटतं, ते तुम्ही  ठरवणंच अधिक योग्य.

धर्मः ग्रहणकाळात कुठलाही पदार्थ खाणं वर्ज्य मानलं जातं. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, असा समज आहे. ग्रहणकाळात खाल्ल्यास नरक भोगावा लागू शकतो, असंही काही जण मानतात. 

विज्ञानः फक्त उघड्यावरच्या वस्तू खाऊ नका. शिजवलेलं अन्न खाण्यास काहीच हरकत नाही. 

...........

धर्मःग्रहणकाळात घराबाहेर पडू नये. गर्भवती महिलांनी तर बाहेर जाणं निक्षून टाळावं. त्या सावलीचा गर्भातील बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विज्ञानपूर्वीच्या काळी रस्त्यावर दिवे नसायचे. ग्रहणकाळात अंधारामुळे अपघात होण्याची भीती असायची. परंतु, आता या समज कालबाह्य ठरतो. 

............

धर्मःनखं कापू नयेत, सुरी-चाकूसारख्या धारदार वस्तू वापरू नयेत. 

विज्ञानः इथेही अंधाराचाच तर्क लागू पडतो. ग्रहणकाळात नखं कापल्यास काही चिरण्यासाठी-कापण्यासाठी सुरू वापरल्यास पाप वगैरे अजिबात नाही.

..............

धर्मः ग्रहणकाळात मुलाचा जन्म होणं अशुभ मानलं जातं. त्याच्या आयुष्यावर ग्रहणाचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं म्हणतात. 

विज्ञानः फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग चंद्रग्रहणाच्या दिवशीच जन्माला आला होता. तो आज यशोशिखरावर विराजमान आहे. 

............

आजच्या ग्रहणाचं वैशिष्ट्यः

पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :Lunar Eclipse 2018चंद्रग्रहण 2018scienceविज्ञान