दुष्काळाच्या छायेत सापडला मेंढपाळ व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:59 IST2018-05-11T00:59:45+5:302018-05-11T00:59:45+5:30
अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

दुष्काळाच्या छायेत सापडला मेंढपाळ व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ: अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
सामान्यत: भटक्या विमुक्त जातीत हा व्यसाय वडीलोपार्जीत व परंपरागत म्हणून केला जातो. शासनाने या समाजासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. हा समाज राज्य घटनेनुसार एस.टी. मध्ये समाविष्ठ असून महाराष्ट्र शासनाने त्यांना एनटी क चा गाजर देवून या समाजावर अन्याय केला जातो. त्यामुळे हा समाज अद्यापही दारिद्रयात खितपत पडलेला असून यात्रीक युगातही प्रगती पासून कोसो दूर आहे.खांद्यावर कावळ एका हातात काठी दुसऱ्या हातात पाण्याची केटली, डोक्याला फेटा व अंगात सदरा असा साधा पेहराव मेंढपाळाचा असतो.
जिल्ह्यात चिचाळ, जैतपूर, दांडेगाव, मेंढा, पुयार, कान्हळगाव, खैरी, खातखेडा, गोसे, सिलेगाव, रोहा, सिल्ली असा जिल्ह्यातील मोजक्याच गावातील धनगर बांधव शेळ्या, मेंढाचा व्यवसाय करतात. वास्तविक शेकडो रिकाम्या हातांना उद्योग म्हणून चांगला रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या मेंढ्याळ व्यवसायाला प्रगतीची दारे अजुनही खुली झालेली दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी येणाºया दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील व्यवसायीकांना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही हे व्यावसायीक आपल्याच दिनचर्चेत खुश आहेत.
झुडपी वनकायद्यामुळे मेंढ्यांना जंगलात प्रवेश बंदी झाली आहे. तसेच इतरत्र चाºयासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने व या वर्षाला कडक उन्हाळ्याची तिव्रतेने तळे, बोळ्या, सरोवरे, संपूर्ण आटून, चाऱ्या पाण्यासाठी हा मेंढपाळ वनवन भटकत आहे. निरनिराळ्या जातीच्या वृक्षांचा पालापाचोळा खाणाºया मेंढ्या निकृष्ठ चाऱ्यामुळे अर्धपोटी राहुन विविध रोगांना बळी पडत आहेत.
तसेच या वर्षाला घटसर्प, गोवर तोंडखुरी व चौकशी अशा साथीच्या रोगाची लागण असून हा आशेक्षीत मेंढपाळ रानावणात भटकंती करताना आपल्या पारंपारिक पद्धतीचा उपचाराचा अवलंब करीत आहे. यात शेळ्या मेंढ्या बºया होण्याऐवजी मृत्युमुखी पडतात.
मेंढ्यापासून मिळणाऱ्या लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्यात येतात. कांबळ, बेड, ब्रश, फुल्ली स्वेटर, मफलर, कातडी कमावणे आदी वस्तू सोबतच दुधदुभत्याचाही व्यवसाय करता येतो तथापी यंदाच्या कलेशदायक दुष्काळामुळे पुरेस पाणी व चार आताच मेंढ्यांना दिसेनासा झाला आहे. पुढे यापेक्षाही विपरीत स्थित्ी निर्माण होण्याची शक्यता आहे.