शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांची तहान भागविणारेच तहानलेले

By admin | Updated: May 23, 2016 02:24 IST

संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे

धरण उशाला-कोरड घशाला : जॅकवेल कर्मचारी, बरबडा व चौधरा गावकऱ्यांची व्यथा रूपेश उत्तरवार यवतमाळ संपूर्ण यवतमाळकरांची वर्षानुवर्षांपासून तहान भागविणारे, त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे जॅकवेल कर्मचारीच निळोणा धरणाच्या पाण्यापासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चापडोह प्रकल्प किंवा लगतच्या शेतशिवारातील विहिरींवर अवलंबून रहावे लागते. निळोणा धरण पूर्णत: आटल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असा हा प्रकार पुढे आला. १९७२ ला यवतमाळच्या दक्षिणेकडे गोधनी गावाजवळ निळोणा धरण अस्तित्वात आले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलची निर्मिती करण्यात आली. धरणाच्या सुरक्षेसह पाणीपुरवठा नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तेथेच निवासाची व्यवस्था केली गेली. आजच्या घडीला तेथे सुमारे १५ कर्मचारी कुटुंबासह राहतात. शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. मात्र त्यांनाच या निळोणा धरणाचे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. सुरुवातीची काही वर्ष हे कर्मचारी जुन्या विहिरीचे पाणी पित होते. परंतु त्यात ब्लिचींग पावडर नसल्याने आजाराचा धोका वाढला. त्यामुळे प्रकल्प क्षेत्राच्या गावातील जुन्या विहिरींचे पाणी बंद झाले. नंतरच्या काळात चापडोह प्रकल्पावर शुद्धीकरण केंद्र तयार झाल्याने हे कर्मचारी तेथून पाणी आणतात. अनेकदा त्यांना शेतशिवारातील विहिरींचा आधार घ्यावा लागतो. कित्येकदा यवतमाळवरून पाणी नेण्याची वेळ त्यांच्यावर येते. लाखो नागरिकांना पाणी पाजणारेच तहानलेले आहेत. त्यांच्या पाणीटंचाईकडे कुणाचेच लक्ष नसते. पाणी डोळ्याने दिसते पण पिता येत नाहीनिळोणा धरणाचे अथांग पाणी घराच्या अंगणातून वर्षभर डोळ्याने दिसते. परंतु पिता येत नाही, अशी व्यथा या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बरबडा व चौधरा या गावातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविली. बरबडा गावात पाच हातपंप आहे, यातील चार दूषित असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. एक हातपंप आहे पण आता उन्हाळ्यात तोसुद्धा खोल गेला आहे. गावातील सार्वजनिक विहिरीला पाण्याचा थेंब नाही. शेतातील विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. चौधरा गावासाठी जलस्वराज्यमधून नळ योजना सुरू झाली. मात्र वीज पुरवठा नसल्याने व पाणी खोल गेल्याने ते मिळत नाही. आज या गावात प्रत्येकाच्या डोळ्यापुढे धरणातील पाणी आहे. मात्र ते पिता येत नाही, अशी अवस्था आहे. चौधरा गावाला जाण्यासाठी कच्चा रोड आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास दोन ते तीन दिवस तो सुरु होत नाही. गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. केव्हाही गावातील आबालवृद्ध पाणी भरण्यातच व्यस्त दिसतात. चौधरा येथील सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली सुरेश मेश्राम यांनी गावकऱ्यांची ही व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. शुद्ध पाणी मिळत नाही - उत्तम मोकाशेनिळोणा धरणाच्या जॅकवेलवर १९७४ पासून पंप आॅपरेटर पदावर कार्यरत असलेले उत्तम मोकाशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, निळोणा धरणाचे पाणी हे रॉमटेरियल आहे. त्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध झाल्यानंतरच ते शहराला पुरवठा केले जाते. परंतु निळोणातील हे शुद्ध पाणी आम्हाला कधीच मिळत नाही. चापडोहच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आम्हाला पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते.