शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

वन्यजीव उमरखेडमध्ये, डीएफओ पांढरकवड्यात!

By admin | Updated: October 11, 2015 00:35 IST

जिल्ह्यात वन्यजीव विभागाचे सर्वाधिक वनक्षेत्र उमरखेड तालुक्यात विस्तारले असताना त्याचे उपवनसंरक्षक कार्यालय पांढरकवडा येथे थाटले ....

५४ हजार हेक्टर वनक्षेत्र : टिपेश्वर-पैनगंगा अभयारण्य यवतमाळ : जिल्ह्यात वन्यजीव विभागाचे सर्वाधिक वनक्षेत्र उमरखेड तालुक्यात विस्तारले असताना त्याचे उपवनसंरक्षक कार्यालय पांढरकवडा येथे थाटले गेल्याने यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्च २०१४ मध्ये पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाचे स्वतंत्र उपवनसंरक्षक (डीएफओ) कार्यालय स्थापन झाले. या कार्यालयांतर्गत टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील खरबी, उमरखेड, बिटरगाव व टिपेश्वर ही चार वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. यातील खरबी, उमरखेड व बिटरगाव ही तीनही वनपरिक्षेत्र कार्यालये उमरखेड तालुका व परिसरात विस्तारलेली आहेत. त्यानंतरही डीएफओ कार्यालय तेथून १५० किलोमीटर दूर पांढरकवडा येथे थाटण्यात आले. दोनही अभयारण्यमिळून ५४ हजार ९६ हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यातील तीन वनपरिक्षेत्र मिळून तब्बल ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर टिपेश्वरमध्ये १४ हजार २९ हेक्टर क्षेत्र आहे. पांढरकवडा डीएफओ कार्यालयापासून खरबी १००, उमरखेड १२५, तर बिटरगाव वनपरिक्षेत्र १५० किलोमीटरवर आहे. कार्यालयीन कामासाठी पांढरकवड्याला येताना तेथील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होते. तेथे अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. गिरीष वशिष्ठ हे पांढरकवडा वन्यजीव विभागाचे पहिले डीएफओ आहेत. ते सहा महिने राहिले. त्यानंतर कोल्हापूर येथील टी.पी. पाटील बदलून आले. मात्र आजारामुळे त्यांना त्यांच्या गावाजवळ कोल्हापूरला सामाजिक वनीकरण विभागात बदली देण्यात आली. ७ आॅक्टोबरला ते कार्यमुक्त झाले. अद्याप या जागेवर कुणाची नियुक्ती नाही. वन्यजीव विभागाला राजेंद्र बोराडे हे एकमेव सहायक वनसंरक्षक असून त्यांचे मुख्यालय किनवटला आहे. वास्तविक अभयारण्यात दोन एसीएफची आवश्यकता आहे. त्याचा प्रस्ताव गतवर्षी एसीएफ लॉबीने मोर्चेबांधणी करून रद्द करून आणला. वन्यजीव विभागात एका एसीएफकडे चार परिक्षेत्र आहेत. तर पांढरकवडा प्रादेशिक विभागात सहा वनपरिक्षेत्रांसाठी सहा एसीएफ आहेत. वन्यजीवमध्ये एकही सर्वेअर नाही. तेथे लिपिकांचीही वाणवा आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिक काढून डीएफओ कार्यालय चालविले जात आहे. वन्यजीव विभागात सुमारे १५० वनकर्मचारी सेवारत आहेत. वन्यजीव विभागात ४५ वर्षांवरील वनकर्मचाऱ्यांना नेमणूक देऊ नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र हा आदेश दुर्लक्षित करून बहुतांश सेवानिवृत्तीवर आलेल्या वनकर्मचाऱ्यांना अभयारण्यात नेमले गेले आहे. सरळ सेवेचा एकही वनपाल तेथे नाही. तेथील कर्मचाऱ्यांना अग्निशस्त्रे दिली गेली. मात्र ती चालविण्याचे प्रशिक्षण अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे वाहने आहेत मात्र इंधनाचा निधी तीन ते चार महिने मिळत नाही. पांढरकवडा डीएफओ कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. टिपेश्वरला तेलंगाणा राज्याची तर अन्य तीन वनपरिक्षेत्रांना मराठवाडा विभागाची सीमा लागलेली आहे. पूर्वी टिपेश्वर अभयारण्य नागपूरच्या पेंच अंतर्गत, तर अन्य तीन परिक्षेत्र अकोला वन्यजीव विभागात समाविष्ट होते. मात्र अकोल्यातून या वनपरिक्षेत्रांना कायम उपेक्षितच ठेवले गेले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत आणि मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी तरी अभयारण्याची दुरावस्था सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)