शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पूरग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

By admin | Updated: August 8, 2015 02:43 IST

तालुक्यातील पळशी गावकऱ्यांच्या ८ आॅगस्ट ही तारीख कायमची स्मरणात आहे.

नागरिकांचा टाहो : शासन-प्रशासनाचे उदासीन धोरणअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील पळशी गावकऱ्यांच्या ८ आॅगस्ट ही तारीख कायमची स्मरणात आहे. २००६ मधला हा दिवस कुणीही विसरू शकत नाही. महापुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. आता या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाले. मात्र पूरग्रस्तांच्या व्यथा कायमच आहे. पैनगंगेच्या रेडझोनमधील गावांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडले आहे. परिणामी पावसाळा आला की येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडते. उमरखेड तालुक्याची जीवनदायी असलेली पैनगंगा नदी पावसाळ््यात आपल्याच लेकरांवर कोपते. वर्षानुवर्षे पैनगंगेच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसत आहे. १९५८ पासून महापूर या गावातील नागरिकांनी बघितले आहे. मात्र २००६ सारखा महापूर कधीच बघितला नाही, असे या परिसरातील जानते वयोवृद्ध सांगतात. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला, त्यातच इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगेचे पात्र फुगले. पाणी नदी तिरावरील गावांमध्ये शिरू लागले. पळशी गाव जलमय झाले होते. जीव वाचविण्यासाठी शेकडो नागरिक घराच्या छतावर चढून बसले होते. तत्कालिन सरपंच विलास सोळंके यांनी महसूल व पोलिस प्रशासनाला पळशी गावाची आपबीती मोबाईलवरून सांगितली. तत्कालिन पालकमंत्री मनोहरराव नाईक यांनी पळशी गावाकडे धाव घेतली. सैन्याच्या मदतीने तीन हजारावर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री रात्रभर पैनगंगेच्या तिरावर ठाण मांडून बसले होते. महापूर ओसरला आणि सुरू झाला आश्वासनांचा महापूर. मुख्यमंत्र्यांपासून आमदारापर्यंत सर्वांनी त्यावेळी पुनर्वसनाचे आश्वासन दिले, प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. परंतु अद्यापही पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे. पुनर्वसनासाठी पळशीच्या नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. निवेदने दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही, उमरखेड तहसीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पुनर्वसन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे, मुंबई येथे एक बैठकही झाली होती. आवश्यक ती जागा उपलब्ध करून पळशी, देवसरी, चिंचोली संगम या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. परंतु मशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. आता महापुराला नऊ वर्षे झाली, परंतु पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. आता पुनर्वसन काधी होते याकडे लक्ष लागले आहे.