शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये ग्रामीण शिक्षणाची दैना

By admin | Updated: January 23, 2015 00:11 IST

आदिवासी बहुल आणि डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाची दैनावस्था झाली आहे.

अविनाश खंदारे उमरखेड आदिवासी बहुल आणि डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाची दैनावस्था झाली आहे. सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही मराठी वाचता येत नाही तर आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वत:चे नाव इंग्रजीत लिहिता येत नाही. बहुतांश शिक्षक मुख्यालयाला दांडी मारून शहरात राहतात. त्यामुळे त्यांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत आहे. उमरखेड तालुक्यात १७७ शाळा असून ७७७ शिक्षक कार्यरत आहे. या ठिकाणी २४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. प्राथमिक शिक्षण हक्क कायदा अलिकडेच लागू झाला. परंतु ग्रामीण भागात यावर उपाययोजना होताना दिसत नाही. शासनाचे प्रकल्प केवळ कागदावरच राहतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांना मध्यान्ह भोजन ही महत्वाकांक्षी योजनाही राबविल्या जाते. परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी केवळ खिचडी मिळते म्हणून शाळेत येत असल्याचे दिसून येते. आजही आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी तर सोडा मराठीही वाचता येत नाही. विद्यार्थ्याला नापास करायचे नाही, असा आदेश आहे. त्यामुळे शिक्षक शिकवितानाही दिसत नाही. बंदी भागातील शाळांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे. पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना पास करण्याचे आश्वासन दिले जाते. काही ठिकाणी तर दहाव्या वर्गात पास करण्याचीही गॅरंटी दिली जाते. मात्र कॉपीमुक्त अभियानामुळे यालाही लगाम लागला आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतविले जाते. अनेक शिक्षक तर आज लिपिक झाल्यासारखे दिसून येतात. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंद, दैनंदिनी नोंदी, गृहपाठ, स्वाध्याय, घटक चाचणी यातच शिक्षकांचा वेळ जातो. अनेक ठिकाणी वर्ग चार आणि शिक्षक दोन अशी अवस्था आहे.