शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री

By admin | Updated: April 12, 2017 00:10 IST

गेल्या काही महिन्यांपासून उमरखेड तालुक्यात भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खाद्यपदार्थात भेसळ वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उमरखेडकरांचे आरोग्य धोक्यात : अन्न प्रशासन विभाग केवळ नावालाचउमरखेड : गेल्या काही महिन्यांपासून उमरखेड तालुक्यात भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खाद्यपदार्थात भेसळ वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न औषधी प्रशासन मात्र लक्ष देण्यास तयार नाही. गेल्या काही वर्षात एकदाही या विभागाने या परिसरात अचानक कारवाई करून नमुने प्रयोगशाळेत पाठविले नाही, त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन केवळ नावालाच असल्याचे दिसून येते.तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांपासून किरकोळ दुकानदारांपर्यंत भेसळयुक्त खुले खाद्यतेल विकले जात आहे. तालुक्यात नांदेड, आदिलाबाद तसेच इतर काही शहरांमधून तेलाचे टँकर व टाक्या आणल्या जातात. हे टँकर उमरखेड शहरासह तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, ब्राह्मणगाव, चातारी, मुळावा, पोफाळी आदी गावांमधील व्यापाऱ्यांना आपला माल विकतात आणि त्यानंतर लोखंडी डब्यात तेल भरून एखाद्या कंपनीचे लेबल लावून तेलाची विक्री केली जाते. हा सर्व व्यवहार खुलेआम सुरू आहे. परंतु याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. तसेच याबाबतचे कोणतेही पक्के बिल देण्यात येत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. आपले चांगभले करून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारचा धंदा सुरू आहे. गोरगरीबांना महिन्याकाठी १५ लिटर तेलाचा डबा नेणे परवडत नाही. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील विविध गावांत व शहरातील वस्त्यांमध्ये किराणा दुकानातून खुल्या तेलाच्या स्वरूपात या खाद्यतेलाची विक्री करण्यात येते. २०११ च्या जनगणनेनुसार उमरखेड तालुक्याची लोकसंख्या दोन लाख ६० हजार असून सद्यस्थितीत ती चांगलीच वाढत आहे. यातील केवळ बोटावर मोजण्याइतपत नागरिक सोडल्यास बहुतांश नागरिक हेच तेल वापरत आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विभागात येणाऱ्या महागाव, काळी दौ., फुलसावंगी, मुडाणा, सवना, गुंज, हिवरा यासह ढाणकी, मुळावा, विडूळ, पोफाळी, ब्राह्मणगाव आदी भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खुले तेल विक्री केल्या जात आहे. अशा लोकांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)मोठे मासे पकडणे गरजेचेखाद्य तेलामध्ये भेसळीचे मोठे नेटवर्क आहे. छोट्या दुकानदारांकडून केवळ माल विक्री केल्या जातो. त्यामुळे या भेसळीच्या मुळावर म्हणजे मोठ्या मास्यांवर घाव घालणे गरजेचे आहे. अन्न व औषधी प्रश्नासनाचा निष्क्रियपणा याला कारणीभूत आहे. कधीही कोणतीही कारवाई होत नाही, झाल्यास अर्थपूर्ण सबंधातून दडपली जाते, त्यामुळे अशा भेसळखोरांचे चांगलेच फावत आहे. याबाबत तक्रारी करूनही दखल मात्र घेतली जात नाही.