शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

प्रेयसीसाठी नव्हे, देशासाठी बलिदान द्या

By admin | Updated: March 25, 2017 00:20 IST

आजकालची तरूणाई वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच एकमेकांच्या प्रेमात पडते. त्यातून आत्महत्येसारख्या अप्रिय घटनाही घडतात.

सत्यपाल महाराज : अडेगावात पार पडला प्रबोधन कार्यक्रम, १५ हजारांवर भाविक उपस्थित वणी : आजकालची तरूणाई वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच एकमेकांच्या प्रेमात पडते. त्यातून आत्महत्येसारख्या अप्रिय घटनाही घडतात. असे बलिदान काय कामाचे? प्रियकर, प्रेयसीसाठी बलिदान देण्यापेक्षा तरुण तरुणींनो देशासाठी बलिदान करा, असा उपदेश प्रख्यात सप्तखंजिरी वादक प्रबोधकार सत्यपाल महाराज यांनी गुरूवारी केले. झरी तालुक्यातील अडेगाव येथे रक्तदान महादान फाऊंडेशन, मंगेश पाचभाई मित्र परिवार, हनुमान मंदिर पंचकमिटी व समस्त गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी नववर्ष व शहीद दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरही पार पडले. यात ५० जणांनी रक्तदान केले. पुढे बोलताना सत्यपाल महाराज म्हणाले, आंतरजातीय विवाहाला माझा विरोध नाही. असे विवाह झाले तर समाजातील जातीयतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ बनेल. परंतु प्रेमालाही काही मर्यादा असाव्यात. आई-वडिल जन्म देतात. त्यांनाही आपल्या मुलांकडून काही अपेक्षा असतात. परंतु आजकालची तरूणाई शाळा शिकत असताना अल्पवयीन अवस्थेतच एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेम म्हणजे काय हेदेखील त्यांना कळत नाही. प्रसंगी एकमेकांसाठी या प्रेमविरांनी आत्महत्याही केल्याच्या घटना या समाजात सातत्याने घडतात. आधी शिका, स्वत:ला सुसंस्कारात घडवा. त्यानंतर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करा, असा सल्ला त्यांनी तरूणाईला दिला. या देशासाठी भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू यांनी या देशासाठी प्राण त्यागले. या बलिदानाचा विसर पडू देऊ नका. आपण बलिदान कशासाठी करीत आहोत, याचे भान ठेवा. प्रेमप्रकरणातून आत्महत्या करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. व्यसन समाजाला पोखरून खात आहे. त्यामुळे व्यसनापासून कायम दूर रहा. असेही त्यांनी सांगितले. या प्रबोधनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील ३० ते ३५ गावांतील १५ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला डॉ.अशोक जीवतोडे, डॉ.प्रेमानंद लोढे, उदयपाल महाराज, राजेश नाईक, वन विभागाचे रत्नपारखी, हकीम हुसेन, सरपंच अरुण हिवरकर, आयोजक मंगेश पाचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)