शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

रेल्वेमार्गासाठी थेट जमीन खरेदीचा प्रस्ताव

By admin | Updated: November 7, 2015 02:35 IST

बहुप्रतीक्षित यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला जमीन अधिग्रहीत करताना अनेक अडचणी येत आहेत.

वर्धा-यवतमाळ-नांदेड : मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रशासनाचा अहवाल सादर रूपेश उत्तरवार यवतमाळ बहुप्रतीक्षित यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला जमीन अधिग्रहीत करताना अनेक अडचणी येत आहेत. शासनाच्या प्रक्रियेनुसार कारवाई करण्याला आणखी चार वर्ष लागतील. यामुळे रेल्वेमार्गाच्या कामाला विलंब लागणार आहे. या विलंबावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतजमिनीची थेट खरेदी करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा ११० कोटींचा भुर्दंड वाचणार आहे. प्रस्तावीत यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाकरिता यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड या सात तालुक्यांतील ८० भूसंपादन प्रकरणात ७२२ हेक्टर आर जमीन संपादित करण्याचा प्रस्तावित आहे. ८० पैकी १४ प्रकरणात कलम ४ ची अधिसूचना नवीन भूसंपादन कायदा अंमलात येण्यापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे. या प्रकरणामध्ये नवीन कायद्यानुसार जमिनीचे मूल्यांकन करून निवाडा जाहीर करण्याची कारवाई केली जात आहे. ६६ प्रकरणात भूसंपादन कारवाई करणे आवशक आहे. त्याकरिता ६५५ हेक्टर जमीन लागणार आहे. थेट खरेदी पद्धतीने जमीन संपादित केल्यास एक वर्षात सर्व जमीन ताब्यात घेता येणार आहे. यामुळे प्रकल्पाचे काम वेगाने होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या कामात रेल्वेची परवानगी मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीले आहे.शासनाचे सुमारे १०० कोटी रुपये वाचणार नवीन भूसंपादन कायद्यानुसार प्रस्तावित भूसंपादनास किमान २ वर्ष कालावधी अपेक्षित आहे. दरवर्षी जमिनीचे मूल्य १० टक्कयाने वाढत आहे. यामुळे जमीन भूसंपादित करण्यास अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढत्या खर्चावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमिनीची थेट खरेदी केल्यास रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. या कालावधीत जमिनीचे दर वाढल्याने १०० कोटींचा अतिरिक्त बोजा शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. मात्र या प्रस्तावाने हा बोजा कमी होईल आणि सुमारे १०० कोटी रुपये वाचणार आहेत.