संघटनेचा आरोप : अमरावती उपसंचालकांच्या भूमिकेचा निषेधयवतमाळ : भूमी अभिलेख कर्मचार्यांवर कारवाईचा सपाटा अमरावती विभागाच्या उपसंचालकांनी लावला आहे. यवतमाळ आणि अमरावती विभागातील कर्मचार्यांना लक्ष्य केले जात आहे. कर्मचार्यांच्या शिष्टमंडळालाही वेळ दिला जात नाही, असा आरोप करून त्यांच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.अमरावती विभागातील कर्मचार्यांवर सातत्याने शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी अधिक अडचणीत आणले जात आहे. अमरावती विभागातील काही अधिकार्यांना हाताशी धरून आर्थिक शोषण केले जात आहे. काही कर्मचार्यांना मानसिक त्रासही दिला जात आहे. पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला कर्मचार्यांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे, असा आरोप विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने केला आहे.संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांच्या नेतृत्त्वातील प्रतिनिधी मंडळाला उपसंचालकांनी चर्चेसाठी वेळ दिली. यानंतरही सतत टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपसंचालकांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी करावी, अशी मागणी आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. चर्चेसाठी श्रीराम खिरेकर, कार्याध्यक्ष हिम्मतराव घोम, केंद्र सरचिटणीस अविनाश दशरथकर, जिल्हाध्यक्ष नंदू लकडे, सचिव सुधीर खोरगडे, सलीम तगाले, सोयाम, थेटे, चिकराम, काळे, शरद चव्हाण, वाय.पी. चव्हाण, आनंद टापरे, शरद सोनपरोते, अमोल शेरेकर, कुळसंगे, प्रशांत वारकरी, उत्तरवार, बुंदेले आदी उपस्थित होते.विदर्भ भूमी अभिलेख संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचार्यांचे विविध प्रश्न निकाली निघावे यासाठी लढा दिला जात आहे. अमरावती उपसंचालकांनी घेतलेल्या भूमिकेविरोधातही त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)
भूमी अभिलेखात कारवाईचा सपाटा
By admin | Updated: May 10, 2014 02:29 IST