सात अटकेत : सवा लाखांचा मुद्देमाल जप्तवणी : शहरातील इंदिरा चौकातील आयपीएल सट्टा अड्डय़ावर धाड घालून स्थनिक गुन्हे पथकाने सात जणांना अटक केली. त्यांच्याजवळून एक लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठवडाभरातील वणीतील ही दुसरी कारवाई होय.शहरात आयपीएलवर सट्टा लावला जात असल्याची गुप्त माहिती येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून गुरुवारी रात्री सापळा रचला. इंदिरा चौकातील एका हॉटेलमागे अजहर वैजुद्दीन शेख यांच्या घरी सुरू असलेल्या अड्डय़ावर धाड घातली. यावेळी अजहर सोबतच अरविंद मडावी, शाहीद खान, प्रशांत गांगरडेवार, मुजीबुर शेख, मोहम्मद इकराम आणि संतोष पोतदार हे आयपीएलवर सट्टा घेत असल्याचे आढळले.पथकाने त्यांच्याजवळून २0 मोबाईल, एक दूरचित्रवाणी संच, एक लॅपटॉप, जुगाराचे सहित्य व रोख १५ हजार रुपये असा एकूण एक लाख १५ हजार ९५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारच दिवसांपूर्वी येथील एका आयपीएल सट्टय़ावर यवतमाळ येथील एलसीबी पथकाने छापा मारला होता. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. राजस्थान विरुद्ध हैद्राबाद या संघात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर हा सट्टा लावला जात होता. (कार्यालय प्रतिनिधी)
आयपीएल सट्टय़ावर धाड
By admin | Updated: May 10, 2014 00:56 IST