शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंतरंगात सूचकता, प्रतिमा आणि प्रतीकं आवश्यक

By admin | Updated: January 23, 2015 00:17 IST

साहित्यातील इतर वाड़मय प्रकारापेक्षा कविता हा वेगळा प्रकार आहे. कवितेला जन्मत: सूचकता, प्रतिमा आणि प्रतिकांचे लेणे घेऊनच साकार व्हावे लागते.

यवतमाळ : साहित्यातील इतर वाड़मय प्रकारापेक्षा कविता हा वेगळा प्रकार आहे. कवितेला जन्मत: सूचकता, प्रतिमा आणि प्रतिकांचे लेणे घेऊनच साकार व्हावे लागते. काव्यात हे गुण नसतील तर ते निरस, अर्थहिन आणि बेचक झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन वऱ्हाडी कवी डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांनी केले. ते येथील सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या डॉ.वि.भी. कोलते व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. ‘कवितेचे अंतरंग’ या विषयावर बोलताना डॉ. विठ्ठल वाघ पुढे म्हणाले, जगातील सर्वाधिक प्रतिभावंत कवयित्री म्हणजे घराघरातील सासू असते. कारण एकही सासू सरळ बोलत नसते, त्यातूनच ‘लेकी बोले, सुने लागे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. हजार पानांचा इतिहास एका काव्यातून मांडता येतो. एवढे सामर्थ कवितेत आहे. गद्य साहित्याप्रमाणेच कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नाही. फक्त न पाहिलेले, न अनुभवलेले काहीतरी कवितेत मांडले तर ती कविता हास्यास्पद ठरण्याची शक्यता असते. अवतीभोवतीच्या गोष्टीेचे सुक्ष्म निरीक्षण आणि प्रतिकांचा वापर केल्यास दर्जेदार काव्य निर्मिती होऊ शकते. विदर्भाच्या माणसाचे वर्णन करताना त्यांनी,कशी वरून माणसे, शुभ्र कपाशी सारखी, खोल मनाच्या तळाशी, काळी असते सरकी,या कवितेच्या ओळी सादर केल्या. स्वार्थी माणसांचे वर्णन करताना त्यांनी, कसा झाला हा माणूस, कडुनिंबाचा रे पाला, येल काकडीचा होता, बार कारल्याचा आला, या ओळी सादर केल्या. धर्मांध लोकांचा समाचार घेताना त्यांनी,सोन्याची असते व्दारका, पोथ्यापुराण सांगत असतात, ऐकणाऱ्याच्या घरात मात्र, लाकडाचेही खांब नसतात,या ओळीतून त्यांनी कवितेचे अनेक अंतरंग उलगडले आणि अनेक किस्से सांगून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर वऱ्हाडी कवी शंकर बडे, प्रा.डॉ. रमाकांत कोलते, प्रा.डॉ. शिल्पा वानखडे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. शिल्पा वानखडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी प्रा. घनश्याम दरणे, प्रा. नीता शेटे आदींनी परिश्रम घेतले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)