शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

अभयारण्याच्या ‘त्या’ अधिसूचनेची होळी

By admin | Updated: January 23, 2015 00:10 IST

तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

पुसद : तालुक्यातील इसापूर धरणक्षेत्रातील परिसरात पक्षी अभयारण्याऐवजी आता वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अधिसूचना काढल्याने २१ गावांतील नागरिकांनी जवळा येथे वन्यजीव अभयारण्याच्या जाचक अटींची होळी केली. जवळा येथे माळपठारावरील २१ गावांच्या नागरिकांनी एकत्र येऊन इसापूर येथे वन्यजीव अभयारण्य होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. वन्यजीव अभयारण्यामुळे २१ गावांतील जनजीवन प्रभावित होणार असून अभयारण्य निर्मितीच्या तब्बल १५० जाचक अटींमुळे २५ ते ३० हजार रहिवाशांचे जीवन जगणे कठीण होणार आहे. माळपठार संघर्ष समितीचे जवळा येथील सुधाकर कांबळे म्हणाले, अभयारण्यामुळे येथील अडीच किलोमीटर परिसरात रहिवाशांना चूल पेटविता येणार नाही. तसेच कुऱ्हाडबंदी, जनावरांना चराईबंदी, पीक फवारणी बंदी, विहीर व विंधन विहिरी खोण्यावर बंदी आदी अटी आहेत. त्यामुळे नागरिकांना जगणे कठीण होईल असे ते म्हणाले. आधिच धरणामुळे या २१ गावांचे १९८२ मध्ये पुनर्वसन झाले. त्यामुळे या गावांचा विकास खुंटलेला आहे. ३१ वर्षात विकास झाला नसताना अभयारण्याचे नवे संकट गावकऱ्यांवर कोसळले आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार पक्षी अभयारण्याला गावकऱ्यांचा विरोध नसल्याचे रामदास कांबळे (जवळा) यांनी सांगितले. मात्र वन्यजीव अभयारण्याला २१ गावांतील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचा निर्णय यावेळी गावकऱ्यांच्या झालेल्या सभेत एकमुखाने घेण्यात आला. येत्या २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत वन्यजीव अभयारण्याच्या उभारणीचा निर्णय रद्द करण्यात यावा, असा ठराव घेण्यात येणार असल्याचे सुधाकर कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यावेळी मधुकर कलिंदर,, विलास खंदारे, ज्ञानेश्वर मस्के, मोहन आडे, गुलाब गडदे, गोविंदराव ढुमणे, जयानंद भालेराव, नंदू काकडे, बाळू होडगीर, तुकाराम खोकले, गजानन कुकडे, मारोती घाटे, जयवंता मस्के, प्रफुल्ल धुळे, पिंटू इंगोले, उत्तम मस्के, संतोष पांडे, बळीराम माहुरे, दिगांबर दवणे, रामदास कांबळे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)