शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

‘डीबीटी’मुळे कोट्यवधींचा निधी शिल्लक

By admin | Updated: April 12, 2017 00:05 IST

डीबीटीमुळे (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची तब्बल सा पाच कोटींची साहित्य खरेदी बाधीत झाली.

समाजकल्याण विभाग : सव्वा पाच कोटींची खरेदी बाधीत, अनेक पात्र गरजू राहिले वंचितयवतमाळ : डीबीटीमुळे (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची तब्बल सा पाच कोटींची साहित्य खरेदी बाधीत झाली. परिणामी सेस फंडातून तरतूद करूनही हा निधी शिल्लक राहिला.राज्य शासनाने ५ डिसेंबर रोजी एक पत्रक काढून सर्व साहित्य खरेदीला लगाम लावला. त्याऐवजी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात साहित्याचे अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र सर्व जिल्हा परिषदांना पाठविले. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांमधील समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण आदी विभागांची साहित्य खरेदी ठप्प पडली. या निर्णयावर उपाय काढण्यासाठी प्रथम काहींनी प्रयत्न केले. किमान यावर्षी मार्चपर्यंत थेट खरेदी करू देण्यासाठी त्यांनी धडपड केली. मात्र त्यांचे प्रयत्न फसले. समाजकल्याण विभागाला २० टक्के सेस फंडातून स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना शीलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरविणे, मागासवर्गीय भजनी मंडळाला भजनी साहित्य पुरविणे, विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे, शेतकऱ्यांना आईल इंजिन, ताडपत्री, एचडीपीई पाईप, तुषार सिंचन संच पुरविणे आदींसाठी तरतूद करण्यात आली. डिसेंबरपूर्वीपर्यंत या विभागाने केवळ मागासवर्गीय महिलांना ९० टक्के अनुदानावर ८१ लाखांच्या निधीतून ५१ लाखांच्या शिलाई, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ७० लाखांच्या उपलब्ध निधीतून ४० लाखांच्या सायकली तेवढ्या मशीन पुरविल्या. याशिवाय इतर सर्व योजनांचा निधी वर्षभर खर्चच केला गेला नाही. डिसेंबरमध्ये शासन निर्णयामुळे त्याला पुन्हा ब्रेक लागला. तथापि त्यापूर्वीच या विभागाने उपलब्ध निधीतून मागासवर्गीयांना विविध योजनांचा लाभ दिला असता, तर जिल्ह्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांना मदत मिळाली असती. मात्र डिसेंबरपर्यंत हा विभाग झोपेचे सोंग घेऊन वावरला. लाभार्थी हेलपाटे मारीत थकून गेले. आता डीबीटीमुळे हा निधी तसाच पडून आहे. या विभागाकडे जवळपास चार कोटी सात लाखांचा निधी शिल्लक आहे. (शहर प्रतिनिधी)१३ वनांचीही तीच गतजिल्हा परिषदेतर्फे १३ वने योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात जंगल भागातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविण्यासाठी ४५ लाख, एचडीपीई पाईप पुरविण्यासाठी ४३ लाख, तर पीव्हीसी पाईप पुरविण्यासाठी ४० लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र या तीनही योजनेतून एकाही शेतकऱ्याला लाभ देण्यात आला नाही. परिणामी तब्बल एक कोटी २८ लाखांचा निधी तसाच पडून राहिला. आता या विभागाने ५ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार वेबसाईटवरून दरपत्रक बोलविले आहे. मात्र अनुदानाची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.