लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.यावर्षी अपुºया पावसामुळे पुसद उपविभागातील विहिरी, तलाव, नदी, नाले, धरणे कोरडीच आहे. तथापि, पिकांना अनुकूल पाऊस झाला आहे. मात्र सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे. कपाशीवर विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे पात्या गळत आहे. यामुळे यावर्षी उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. यातून त्यांना लागवड खर्च निघणेही कठीण जाणार आहे. त्यामुळे उपविभागातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहे.पुसद तालुक्यात भारी, मध्यम आणि मुरमाड अशा तीन प्रतीची जमीन आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा तोकडी असल्याने जवळपास ७० टक्के पिके निसर्गावर अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात होती. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमध्ये पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. या विश्रांतीमुळे उथळ जमिनीवरील पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिके आता पिवळी पडून माना टाकत आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. मात्र सोयाबीन व कपाशीवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा धरल्या आहे. कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातून शेतकºयांचा लागवड खर्च निघेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.अनेक शेतकºयांना यावर्षी थकबाकीदार असल्यामुळे कर्जही मिळाले नाही. त्यांनी उधारी व उसनवारी करून पेरणी केली. काहींनी खासगी सावकारांकडून पैशाची तजवीज केली. मात्र आता त्यांना हा खर्च निघेल की नाही, अशी शंका सतावत आहे. शेतकरी कुटुंबातील अनेक सदस्य मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी मोठ्या शहरात कामाला जाण्याच्या तयारीत आहे.भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाहीअपुºया पावसामुळे यावर्षी भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव कोरडेच आहे. सोबतच माती नाला बांध, सिमेंट बंधारेही कोरडे आहे. लघु प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पूस धरण व इसापूर धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे भविष्यात शेती सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.
उत्पन्नात घट येण्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:11 IST
खरीप पिकांना अनुकूल असा पाऊस झाला असला तरी शेतकºयांना उत्पन्नात घट येण्याची चिंता सतावत आहे. पिकांवरील किडींचे आक्रमणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत.
उत्पन्नात घट येण्याची चिंता
ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पाणीटंचाईची झळ कायम