शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

दोन वेळच्या भाजी भाकरीत बाळंतपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:50 IST

कधी काळी ग्रामीण भागातील चालतं बोलतं प्रसूतीगृह म्हणजे गावातील दाई. अशीच एक सर्वगुणसंपन्न दाई हिवरीत आहे.

ठळक मुद्देसुभाबार्इंनी जागविल्या दुष्काळाच्या आठवणी : कपभर चहाच्या बदल्यात बाळाची चार महिने मालीश

शिवानंद लोहिया ।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : कधी काळी ग्रामीण भागातील चालतं बोलतं प्रसूतीगृह म्हणजे गावातील दाई. अशीच एक सर्वगुणसंपन्न दाई हिवरीत आहे. सुभाबाई टिकनोर. अक्षरांची कधीही ओळख झाली नाही, पण सुखरूप बाळंतपण कसं करावं यात तिचे हात निष्णात.घरात अठराविश्व दारिद्र्य. १९७२ च्या दुष्काळात अंबाडीच्या भाकरी खावून जिवंत राहण्याची तिने धडपड केली. आता ती वृद्ध झाली. तिच्या हातून बाळंतपण झालेली अनेक लेकरेही आज तरणीताठी झालीत. कुणी सरकारी नोकरीत गेले, कुणी मोठ्या हुद्द्यावर आहेत. पण सुभाबाईच्या हालअपेष्टांची कुणीच विचारपूस करीत नाही. याचं तिलाही दु:ख वाटतं. आयुष्यभर केलेल्या सेवेबाबत बोलतं केलं, तर सुभाबाई म्हणाली...‘साल आठवत नाय. पण बाबू इंदिरा गांधीचा बंदुकीच्या गोया घालून खून केला व्हता, त्या वर्षापासून मी गावातील गरोदरी लेकीबाळीचं बाळंतपण करते. तवा अन्न धान्याची वानवा व्हती. मंग दोन टायमाच्या भाजी भाकरीची मजुरी म्हणूनही मी बाळंतपण केलं. माह्या हातून बाळंत झालेली काही पोरं आता आजी आजोबा झाले.’ एवढा दीर्घ अनुभव सांगतानाही सुभाबाईच्या बोलण्यात उपकाराची भाषा येत नाही.‘तवा येसट्या व्हत्या, पण रस्ते खड्ड्यात व्हते. म्हणून बाळंतपणं गावातच व्हायचं. आईच्या दुधासारखं टॉनिक नाही, हे माह्या मायनं सांगतलेला मंत्र मी गावागावात पोहोचवला. मायच्या पोटातून जन्म होताच तान्हुल्याले थंड्या पाण्याने अंघोळ घालताच त्याच्या रडण्याने बाळंतीणीच्या वेदना पळून जायच्या. गरिबीतल्या लेकीले गव्हाच्याजाडसर दळलेल्या रव्यात गुळाचेपाणी टाकून केलेला शिरा खावू घालायची. तर खात्या पित्या घरच्या बाळंतीणीला खारिक, खोबरं, काजू, मणुका खाण्यास सांगायची. पण बाबू आता जमाना बदलला हाय. तुरीच्या झाडाले बरबटीच्या शेंगा लागायची वेळ आली...’जुन्या काळाचा पट उभा करताना सुभाबाई बदलत्या काळाची मनाला टोचणारी सलही व्यक्त करते. सिनेमात नाचणाºया अन् शिवारात कापूस वेचणाºया बाया सारख्याच हाडा मासाच्या. पण आज कालच्या लेकी थर्माकोलसारख्या नाजूक झाल्या. मी सहा लेकराची माय. बाळंतपणाच्या दिवसापर्यंत धुणी भांडी केली. विहिरीवरून पाणी काढून आणायची. तरी ठणठणीत राहायची. आताच्या लेकी लई नाजूक झाल्या.... सुभाबाईसारख्या दाईन गावागावात होत्या. कपभर काळ्या चहात चार सहा महिने बाळाची मालीश करून देणारी ही दाई आज वृद्धापकाळात भाकरीसाठी भटकत आहेत.गावात कुणाच्या पोटी मुलगा झाला तर मला चार पायल्या ज्वारी अन् लुगडं भेटायचं. मुलगी झाली तर दोन पायल्या ज्वारी अन् चोळीचा खण मिळायचा. मुला-मुलीतला हा भेदभाव आजही संपला नाही, याचा खेद वाटते.- सुभाबाई टिकनोर,दाईन, हिवरी.