मशागतीचा तिढा : तणनाशकही ठरले फेल यवतमाळ : शेतीवर असलेली संकटांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. यावर्षी अनियमित हवामानामुळे सातत्याने पाऊस झाला. परिणामी मे महिन्यातही शेत हिरवेकंच दिसत आहे. पीक काढून रिकामे झालेल्या शेतात सर्वत्र गाजर गवत वाढले आहे. या गांजर गवताचे निर्मूलन करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. गाजर गवत हे पाच ते दहा वर्षांपूर्वी शहरातील मोकळ््या जागेत दिसत होते. पाहता पाहता त्याने शेताचा धुरा गाठला. आता तर संपूर्ण शेतच गाजर गवताच्या विळख्यात आले आहे. हे गवत जनावरांना खाण्यायोग्य नाही, त्यामुळे जनावरे त्याकडे पाहत नाही. शिवाय अनेक व्यक्तींना गाजर गवतापासून अॅलर्जीसुद्धा होते असा विषारी अंश असलेले गाजर गवत निर्मूल कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गाजर गवताचे बी अतिशय बारिक असून, फुलातील पाकळ््यांसोबत ते सर्वत्र उडते. हवेच्या झुळकीसोबत कित्येक किलोमीटर गाजर गवताचे बी वाहून जाते. आता तर गाजर गवतामुळे उपजाऊ जमिनीलाही पडिक जमिनीचे स्वरुप आले आहे. या गांजर गवतच्या निर्मूलनासाठी सुरूवातीला तणनाशकाचा प्रयोग शेतकरी करत होते.मात्र तणनाशक औषधांचाही फारसा प्रभाव गांजर गवतावर होत नाही. काही दिवस वाढ खुंटल्यानंतर पुन्हा जोमाने गांजर गवताचे झाड वाढू लागते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतात पिकातील आंतर मशागत बंद करण्यात आली, त्याचा परिणाम गांजर गवताच्या वाढीवर झाला आहे. आता या गवतामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. धुऱ्याच्या बांधावर अनेक मोकळ््या जागेतही गाजर गवतच उगवत असल्याने इतर गवतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गवत बारमाही हिरवे राहणारे असून, त्याला वर्षातील कोणत्याही ऋतुत फुल येते. जितकी फुले तितकेच गांजर गवताचे बी असे चक्रच निर्माण झाले आहे. याच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय शेतकऱ्यांकडे नाही. (कार्यालय प्रतिनिधी)कोरडवाहूतही विळखा सिंचनाच्या शेतात गाजर गवत दिसत होते. यावर्षी मात्र कोरडवाहू असलेल्या शेतानांही विळखा बसला आहे. सततच्या पावसामुळे त्याची वाढ जोमाने होत आहे. 1गांजर गवत निर्मूलनासाठी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या शेतात जरी गांजर गवत राहिल्यास निर्मूलनाचा कोणताच फायदा होत नाही. पुन्हा सर्वत्र लवकरच गांजर गवत उगविण्यास सुरूवात होते.2गांजर गवताचे बी हलके व हवेने सहज उडणारे आहे. त्यामुळे लगतच्या पाच-दहा किलोमीटरच्या परिसरात त्याचे बी पसरते. कोणत्याही तापमानात उगविण्याची शक्ती असल्याने सहज वाढ होते. 3निंदण आणि डवरणीच्या पाळ््या देणे जवळपास बंद झाले आहे. बहुतांश शेतकरी सोयाबीनमध्ये तणनाशकांचा वापर करतात. याचा विपरित परिणाम गांजर गवताच्या रुपाने दिसत आहे. मात्र हंगामात शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज ठरतो. शिवाय ही बाब आता खर्चीक झाली आहे.
शेतकऱ्यांपुढे गाजर गवत निर्मूलनाचे आव्हान
By admin | Updated: May 8, 2015 23:52 IST