शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या पायातील घुंगरं अबोल झाली..!

By admin | Updated: March 16, 2017 01:04 IST

नादावलेल्या पायात घुंगरं बांधून ती रंगमंचावर यायची, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सारे सभागृह दणाणून जायचे.

रागिणीची अकाली एक्झिट : जन्मदात्यांचा आक्रोश, छकुली का जगण्यावरच रुसली? संतोष कुंडकर वणी नादावलेल्या पायात घुंगरं बांधून ती रंगमंचावर यायची, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सारे सभागृह दणाणून जायचे. तिच्या जादुई नृत्याविष्काराच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत केवळ टाळ्या आणि टाळ्याच पडत. लावणी असो वा मुजरा किंवा मग कथ्थक.. साऱ्याच नृत्यप्रकारांची ती राणी होती. मादक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करण्याची जादू तिच्या डोळ्यात होती. तिच्या असण्याने स्पर्धा सुगंधी व्हायच्या... पण आता असे घडणार नाही. रंगमंचावर लिलया थिरकणारी तिची नाजूक पावलं आता कायमची स्तब्ध झाली आहेत. रसिक मनाला वेड लावणारी ही नृत्यांगना आता अनंतात विलीन झाली आहे. रागिणी गोडे नावाचं कला विश्वात घोंगावणारं एक वादळं कायमचं आणि कायमचं शांत झालं. तिच्या अकाली जाण्याने तिच्या पायातली घुंगरं आता अबोल झाली आहेत. यापुढे स्पर्धा होतील. नृत्याचे कार्यक्रम होतील. रंगमंचाला तिची प्रतिक्षाही असेल. पण ती तेथे असणार नाही. तिच्या पायातल्या घुंगरांचा नादही आता कुण्या काळजाचा ठाव घेणार नाही. कारण आता ती अनंत यात्रेला निघून गेलीय...कधीच परत न येण्यासाठी....! कला रक्तातच असावी लागते. ती रागिणीच्या रक्त्याच्या थेंबा-थेंबात होती. अगदीच बालपणापासूनच तिला नृत्याचं वेड. सांस्कृतिक विश्वामध्ये अवघ्या महाराष्ट्रात लौैकिक असलेल्या वणी शहराच्या मातीत जन्म घेणाऱ्या रागिणीने शेकडो नृत्य स्पर्धांमध्ये मिळविलेले ढिगभर पुरस्कार पाहिले की, तिच्यातील कलावंत किती मोठी होती, याचा अंदाज येतो. अगदी कोवळ्या वयात तिने मिळविलेलं यश कौैतुकास्पदच होतं. नृत्याचा छंद जोपासताना तिने कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. दहावीत तिनं ९५ टक्के गुण मिळविले होते. नृत्याची आवड असली तरी तिला डॉक्टर व्हायचं होतं. तशी तयारीही तिनं केली. पण नियतीला हे मान्य नव्हतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल. कलेवर कायम प्रेम करणाऱ्या रागिणीचं जीवनावरही नितांत प्रेम होतं. तिच्या गोड चेहऱ्यावर कायम झळकत राहणारं हसू नेमकं तेच सांगायचं. मग ही छकुली जगण्यावरच का रुसली? का असा राग काढला तिनं स्वत:वर? सर्वांनाच मागे टाकून ही वेडी अशी का एकाकी पुढे निघून गेली? ज्या समाजसेवी जन्मदात्याने आजवर अनेकांचे प्राण वाचविले, त्या पित्यालाही हुलकावणी देऊन तिने एका बेसावध क्षणी प्राण त्यागलेत..तुडूंब प्रेम करणाऱ्या माता-पित्याच्या, भावंडांच्या माघारी तिला असा अघोरी खेळ कसा खेळता आला? शेवटी एवढच म्हणावसं वाटत... बुझ जाते हैै कही चिराग सिर्फ आबुदाना की कमी से हर बार सिर्फ कसूर हवा का नही होता...