शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

अ‍ॅथलेटिक्स कोचची ६० दिवसांत केवळ एक दिवस हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली.

ठळक मुद्देयवतमाळची अ‍ॅलर्जी : नियमित नियुक्तीचा खेळाडूंंना उपयोग काय ?, वेतन रोखण्याचे क्रीडा उपसंचालकाचे आदेश

नीलेश भगत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खेळाडूंंना मार्गदर्शन व्हावे म्हणून कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलॅटिक्स मार्गदर्शकाने गेल्या ६० दिवसात केवळ एक दिवस येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अखेर अमरावतीच्या क्रीडा उपसंचालकांनी या मार्गदर्शकाचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले आहेत.येथील नेहरू स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक तयार झाल्यावर ट्रॅकवर सराव करणाºया खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने यवतमाळ क्रीडा कार्यालयातून नागपूर येथे दोन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या राज्य क्रीडा मार्गदर्शकाला पुन्हा यवतमाळ येथेच नियमित नियुक्त केले. मात्र सदर राज्य क्रीडा मार्गदर्शक दोन महिन्यांपासून नियुक्त होऊनही केवळ एक दिवस क्रीडा कार्यालयात हजर झाले आहेत.येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सॉफ्टबॉल, क्रिकेट व अ‍ॅथलेटिक्स या तीन खेळांचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आहेत. संबंधित खेळात जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करणे, जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षण केंद्रात येणाºया खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे, स्पर्धेचे आयोजन, उन्हाळी प्रशिक्षण शिबिर राबविणे, खेळाचा प्रचार-प्रसार करणे आदी अनेक कार्य राज्य क्रीडा मार्गदर्शकांना करावे लागते.१४ जून २०१६ रोजी मूळच्या यवतमाळ येथीलच असलेल्या अरुणा गंधे यांची जिल्हा क्रीडा कार्यालयात अ‍ॅथलेटिक्सच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून शासनाने नियुक्ती केली. नेहरू स्टेडियमवरच सराव करून शासकीय नोकरीत लागलेल्या गंधे यांची कोच म्हणून नियुक्ती झाल्यावर येथील खेळाडूंमध्ये आशादायक वातावरण होते. मात्र नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसात त्यांची नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर सेवा देण्यात आली.दरम्यान नेहरू स्टेडियम येथे विदर्भातील दुसरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार झाला. तेव्हा जिल्ह्यातील अ‍ॅथलिट खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शकांची खेळाडूंकडून मागणी झाल्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी अरुणा गंधे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांच्या नियमित सेवेसाठी वरिष्ठांकडे शिफारस केली. खेळाडूंची मागणी मान्य होऊन गंधे यांची २२ जुलै २०१९ रोजी नियमित नियुक्ती केली.मात्र त्यांनी नियुक्तीच्या दिवशी तीन दिवसांची रजा घेऊन पुन्हा १४ आॅगस्टपर्यंत वैद्यकीय रजा घेतली. तेव्हापासून कोणत्याही सूचनेशिवाय त्या सतत गैरहजर आहेत. नुकतेच ११ सप्टेंबर रोजी सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण करण्यात आले. नवीन ट्रॅकवर सरावासाठी इच्छुक खेळाडू मात्र मार्गदर्शक असूनही पोरके आहेत.अरुणा गंधे कोणतीही सूचना न देता सतत गैरहजर आहेत. त्याबाबत क्रीडा उपसंचालक अमरावती यांना कळविले असून त्यांनी त्यांचा पगार न काढण्याबाबत सूचना दिली आहे.- घनश्याम राठोड,जिल्हा क्रीडा अधिकारी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ