शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

मेडिकल फिटनेससाठी कोविड केंद्रावर परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढण्याकरिता सुरुवातीला एका व्यक्तीची मेडिकल फिटनेस ग्राह्य धरले जात होते. आता प्रवासासाठी निघणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस अपलोड केल्याशिवाय पास अप्रूव्ह केली जात नाही. धामणगाव मार्गावरील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी एका थर्मल गनच्या सहाय्याने फिटनेस तपासणी करत आहे.

ठळक मुद्देलांबच लांब रांग : तळपत्या उन्हात काढावे लागतात दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक कामासाठी जाण्याकरिता ई-पास काढणे गरजेचे आहे. ही ई-पास मिळविण्यासाठी प्रवासाला जाणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करून हे प्रमाणपत्र जोडावे लागते. वैद्यकीय तपासणी केवळ धामणगाव मार्गावरील कोविड सेंटरमध्ये केली जाते. त्याठिकाणी बाहेरगाववरून आलेले व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढणारे या सर्वांची एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाते. त्यामुळे येथे लांबच लांब रांगा लागत असून कित्येक तास उन्हात काढावे लागत आहे.जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पास काढण्याकरिता सुरुवातीला एका व्यक्तीची मेडिकल फिटनेस ग्राह्य धरले जात होते. आता प्रवासासाठी निघणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस अपलोड केल्याशिवाय पास अप्रूव्ह केली जात नाही. धामणगाव मार्गावरील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी एका थर्मल गनच्या सहाय्याने फिटनेस तपासणी करत आहे. शरीराचे तापमान मोजून मेडिकली फिट-अनफिट सर्टिफिकेट दिले जात आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर तपासणीचा भार आहे.गेल्या काही दिवसांपासून लग्न व इतर कार्यप्रसंगासाठी, उपचारासाठी, शैक्षणिक कामकाजासाठी, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ई-पासकरिता लागणारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोबतच बाहेरगावावरून परत आलेले नागरिकही वैद्यकीय तपासणीसाठी याच केंद्रावर येतात.मंगळवारी धामणगाव मार्गावरील पॉलिटेक्नीक कॉलेजमधील केंद्रावर वैद्यकीय तपासणीसाठी लांबच लांब रांग लागली. त्याठिकाणी एकच डॉक्टर तपासणी करत असल्याने नागरिकांना तब्बल दोन तास तळपत्या उन्हात उभे राहावे लागत होते. कुटुंबातील सर्वच सदस्यांचे मेडिकल फिटनेस जोडावे लागत असल्याने लहान मुले, महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांची मोठी अडचण होत होती. तळपत्या उन्हात त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. या परिसरात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने अनेकांच्या घशाला कोरड पडली. गेल्या दोन दिवसांपासून या केंद्रावर मेडिकल फिटनेस मिळविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येथे दोन ते तीन डॉक्टर थर्मल गनसह ठेवण्याची गरज आहे. अन्यथा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्याच्या रांगेतच एखादा कायमचा अनफिट होण्याची भीती व्यक्त होत आहे.फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाकोविड केअर केंद्रावर एकच थर्मल गन असल्याने तपासणी करता-करता त्यातील सेल डिस्चार्ज झाले. वेळेवर सेलसाठी धावाधाव करावी लागली. त्यानंतर छापील असलेले मेडिकल सर्टिफिकेट संपले. त्यामुळे आणखीच तारांबळ उडाली. नागरिक रांगेत लागून थकल्याने परिसरात पूर्णपणे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला. बाहेरगावहून येणारे व यवतमाळातून बाहेरगावी जाणारे एकाच रांगेत लागत असल्याने येथे कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे खासगी प्रॅक्टीशनर डॉक्टरकडूनही घेता येते. कोविड केंद्रावरच मेडिकल फिटनेस घेण्याची गरज नाही. गरिबांसाठी नि:शुल्क व्यवस्था केली आहे. नोंदणीकृत खासगी डॉक्टरांचे सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येते.- ललितकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या