शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

जिल्हा बँकेचे शासनाकडेच ६० कोटी रुपये थकीत

By admin | Updated: June 14, 2015 02:41 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतर करताना शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५ टक्के निधी दिला जातो.

यवतमाळ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतर करताना शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५ टक्के निधी दिला जातो. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या निधीतील ६० कोटी रुपये शासनाने अद्याप बँकेला दिलेले नाही, तर दुसरीकडे शासनाचेच मंत्री-आमदार जिल्हा बँकेला ‘कर्ज वाटप न झाल्यास कारवाई करू’ अशी तंबी देत आहेत. या विसंगतीची जिल्ह्याच्या राजकीय गोटात चर्चा आहे.जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नापिकी व दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, रूपांतरण केले जाते. त्यापोटी जिल्हा बँकेला १५ टक्के रक्कम शासन अदा करते. सर्वप्रथम सन २००९-१० मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाचे रूपांतर केले गेले होते. त्यातील १५ टक्क्यांपोटीचे ३६ कोटी रुपये बँकेला अद्याप शासनाकडून मिळाले नाही. सन २०१३-१४ आणि आता २०१४-१५ या वर्षातसुद्धा कर्जाचे रूपांतरण केले गेले. याची अनुक्रमे १३ कोटी व ११ कोटींची रक्कम आहे. असे एकूण ६० कोटी रुपये जिल्हा बँकेला शासनाकडून घ्यायचे आहे. या रकमेसाठी बँकेकडून वारंवार सहकार प्रशासनामार्फत मंत्रालयात पाठपुरावा केला जातो. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हा निधी मिळाला नाही. या निधीवर केवळ साडेपाच टक्के व्याजदर आकारला जात असल्याने ही रक्कम बँकेच्या आर्थिक प्रगतीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण व सोयीची मानली जाते. मात्र या रकमेसाठी बँकेला पाच वर्षांपासून पाठपुरावा करावा लागत आहे. ही रक्कम तत्काळ आणून देवून बँकेची गैरसोय दूर करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी-पदाधिकारी मात्र बँकांनाच ‘कर्ज वाटप न केल्यास कारवाई’, अशी तंबी देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्दिष्ट घटविल्यानंतर जिल्हा बँकेचे कर्ज वाटप १०० टक्क्याकडे वाटचाल करीत असले तरी राष्ट्रीयकृत बँका त्यात माघारल्या आहे. या बँकांनी आतापर्यंत १४० कोटींचेच कर्ज वाटप केल्याची माहिती आहे. ही टक्केवारी अवघी २५ एवढी आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी बँकर्स कमिटीची बैठक घेतली. त्यात बँक व्यवस्थापकांकडून पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला गेला. आधी कर्जाचे रूपांतरण व नंतर वाटपावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा बँकेचे उद्दिष्ट ६६४ कोटींवरून २५० कोटींवरजिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुरुवातीला ६६४ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. मात्र या बँकेचे थकबाकीदार मोठ्या संख्येने असून त्यांना पुन्हा कर्ज देणे शक्य नसल्याची बाब निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे उद्दिष्ट कमी करून अवघे २५० कोटींवर आणले आहे. बँकेने आतापर्यंत ३७ हजार शेतकऱ्यांना २४७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. हे वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून आणखी १२ ते १३ कोटी वाटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाटपाचा आकडा २६० कोटींवर अर्थात उद्दिष्टापेक्षा अधिक पोहोचणार आहे.