सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत भरीव यश संपादन केले आहे. दहा रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना पूर्ण बरे करून घरी पाठविले आहे. आता खरी या डॉक्टरांची कसोटी लागत असून ५० रुग्णांच्या उपचारासाठी ६० डॉक्टरांचे ३४ युनिट परिश्रम घेत आहे.शासकीय रुग्णालयात ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर २४८ कोरोना संशयित विलगिकरण कक्षात उपचार घेत आहे. या डॉक्टरांसोबत परिचारिका, वर्ग-४ कर्मचारीसुद्धा अहोरात्र झटत आहे. सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांच्या नेतृत्वात युनिट तयार करण्यात आले आहे. १६ वरिष्ठ डॉक्टर यामध्ये कार्यरत आहे. एकूण ३४ युनिट तयार केले असून यामध्ये डॉक्टर, सिस्टर्स व इतर आरोग्य कर्मचारीमिळून ६० जण कार्यरत आहे. या डॉक्टरांनी आतापर्यंत डब्ल्यूएचओकडून मिळालेल्या सूचनेनुसारच कोरोना रुग्णांवर उपचार केले आहे. उपचाराचा प्रोटोकॉल पाळत दहा रुग्णांना ठणठणीत बरे करण्यात यश मिळाले आहे.डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असले तरी आता वाढलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. एकाचवेळी ५० रुग्ण असून २४८ संशयित आहे. २८८ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांपुढेही काही अडचणी येत आहे.वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेताना रुग्णालय प्रशासनाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पीपीई किट दिल्यानंतर अनेकदा समजूत घातल्यानंतरच आयसोलेशन वॉर्डाकडे जाण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता तयार होते. उपचारात असणारे डॉक्टर व इतर स्टाफ हा घरी न जाता मेडिकल परिसरातील हॉटेल आणि होस्टेलमध्येच मुक्कामी आहे.आता रुग्ण संख्या ५०रविवारी १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यात येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण वाढत चालला आहे. आता शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० झाली आहे. २४८ कोरोना संशयित शासकीय रुग्णालयात दाखल आहे. रविवारी नव्याने ३९ जण आयसोलेशन वार्डमध्ये दाखल झाले आहे. ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत २८८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, घराबाहेर पडू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी केले आहे.रुग्णांकडून माहितीची लपवालपवीकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व संशयिताकडून वैद्यकीय टिमला योग्य माहिती दिली जात नाही. १४ दिवसांच्या कालावधीत कुणाच्या संपर्क आले का असा साधासरळ प्रश्न विचारल्यानंतर संबंधित रुग्ण अथवा संशयित माहितीची लपवालपवी करत केवळ चारच व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे सांगतात. यामुळे कोरोनाचा फैलाव कुठपर्यंत झाला याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. १४ दिवसात चार व्यक्तीच्याच संपर्कात एखादी व्यक्ती कशी येवू शकते हा देखील प्रश्न या उत्तरामुळे डॉक्टरांना पडला आहे.
कोरोना उपचारासाठी ६० डॉक्टरांचे ३४ युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST
डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असले तरी आता वाढलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. एकाचवेळी ५० रुग्ण असून २४८ संशयित आहे. २८८ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांपुढेही काही अडचणी येत आहे. वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेताना रुग्णालय प्रशासनाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
कोरोना उपचारासाठी ६० डॉक्टरांचे ३४ युनिट
ठळक मुद्देदहा जणांवर यशस्वी उपचार : हॉटेल व होस्टेलमध्ये मुक्काम