शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

33 हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेची मेहनत, स्वयंसेवी संस्थांची धडपड अन् रुग्णांची इच्छाशक्ती हेच औषध

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या अत्र-तत्र-सर्वत्र कोरोनाने भयकंप उडविला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३९ हजार लोकांना या विषाणूने ‘बाटविले’ हे खरेच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त लोकांनी कोरोनालाच हरविले, हेही दिलासादायक वास्तव आहे. संशयास्पद वाटलेल्या तब्बल सव्वातीन लाख लोकांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यातील तीन लाख नागरिकांना कोरोनाचा स्पर्शही झाला नसल्याचे अहवालात सिद्ध झाले. याचाच अर्थ, कोरोना जवळपास येऊनही तीन लाख लोकांनी त्याला यशस्वीपणे हुलकावणी दिली; तर ज्या ३९ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यातील तब्बल ३३ हजार लोकांनी अवघ्या आठवडाभरात कोरोनावर मात केली. आरोग्य यंत्रणेची रात्रंदिवस धडपड अन् रुग्णांची स्वत:ची इच्छाशक्ती हेच कोरोनावर पहिले औषध ठरले. ‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली. धंदे बुडाले, रोजगार गेले, व्यापार थांबला, कोरोनाच्या आजारापेक्षाही मानसिक आजारांनी अनेकांना पछाडले. रोज येणारे रुग्णवाढीचे आकडे लोकांना घाबरवून सोडत आहेत. पण त्यासोबतच रोज कोरोनामुक्त होणाऱ्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? एकदा स्वत:लाच विचारून बघा. आपल्याला यापूर्वी कधीच ताप आला नव्हता? खोकला झाला नव्हता? झालाच होता. आपण अनेकदा रुग्णालयात राहून आलो. बरे झालो. मग कोरोना आला म्हणून एवढे हतबल वाटून घेण्याचे कारण नाही. आपल्या एखाद्या मित्राला साधा खोकला आला म्हणून मनात शंकेची पाल चुकचुकू द्यायची नाही. कोरोनाला हरविण्याचे साधे नियम आहेत. तेही विनापैशाचे. गर्दी करायची नाही, एकमेकांपासून थोडे अंतर राखायचे, वारंवार हात धुवायचे, तोंडावर मास्क लावायचा, जरा शंका वाटली, तर तपासणी करून घ्यायची... बस्स! २७ लाख ७५ हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३९ हजार नागरिकांना कोरोना झाला. त्यातील ३३ हजार ३३४ लोक ठणठणीत बरेही झाले. त्यामुळे कोरोनाला घाबरून रोजचे जगणे अवरुद्ध करून घेण्यात काहीच हशील नाही. उलट, शासनाने घालून दिलेले नियम पाळून उरल्यासुरल्या विषाणूलाही पिटाळून लावा. जबाबदार बना, गर्दी टाळा, मास्क लावा आणि युद्ध जिंका. 

ज्यावेळी सोयी नव्हत्या तेव्हा जिंकलो, तर आता का नाही? यवतमाळात ७०-८० वर्षांपूर्वी प्लेग आला होता. तेव्हा आजच्याएवढी आरोग्य यंत्रणा अद्ययावत नव्हती. तरही प्लेगच्या महामारीतून माणसे वाचली. वाचविली गेली. आता एकविसाव्या शतकात कोरोना आलेला असताना वैद्यकीय शास्त्रही पुढारलेले आहे. कोरोनावर औषध मिळाले नसले, तरी केवळ सात आठ महिन्यांतच लस शोधली गेली. काही साधनांचा तुटवडा असला, तरी रुग्ण कसा वाचवायचा, हे डाॅक्टरांना माहिती आहे. जुन्या काळात प्लेग संपवता आला, तर आता आधुनिक काळात कोरोनालाही संपवताच येईल. कोणीही अवसान गाळून बसण्याची अजिबात गरज नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या