शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

१० पालिकांना दोन कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: May 22, 2016 02:04 IST

अल्पसंख्यक क्षेत्राच्या विकासासाठी दिला जाणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांना गेल्या दोन वर्षांपासून

अल्पसंख्यक विकास : मुस्लीम वसाहतींमधील कामे रखडली यवतमाळ : अल्पसंख्यक क्षेत्राच्या विकासासाठी दिला जाणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांना गेल्या दोन वर्षांपासून मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामागे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित यंत्रणेचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. अल्पसंख्यक-मुस्लीम बहुल वसाहतींचा विकास करता यावा म्हणून सन २००७-०८ पासून राज्य शासनाने अल्पसंख्यक विकास योजना आणली. या अंतर्गत नगर परिषदांना दरवर्षी त्यांच्या वर्गवारीनुसार हक्काचा विकास निधी दिला जातो. क वर्ग नगरपरिषदेला पाच लाख, ब वर्गला १० लाख तर अ वर्ग नगरपरिषदेला १५ लाखांचा हा निधी राज्य शासनाकडून थेट नगरपरिषदेच्या बँक खात्यात पाठविला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगर परिषदांना हा निधीच प्राप्त झाला नाही. सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील हा निधी आहे. वणी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, यवतमाळ, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद व उमरखेड या दहाही नगरपरिषदांमध्ये अल्पसंख्यक विकास निधी प्राप्त न झाल्याने ओरड सुरु झाली. अल्पसंख्यक भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांनी हा निधी डोळ्यापुढे ठेऊन कब्रस्थान विकास, संरक्षक भिंत, पथदिवे, नळ जोडणी, शौचालय, रस्ते, नाल्या या सारखी कामे सूचविली. मात्र दोन वर्षांपासून निधीच नसल्याने ही प्रस्तावित कामे फाईलीतच राहिली. दरम्यान काही जागरुक लोकप्रतिनिधींनी निधी न येण्यामागील कारणांचा शोध घेतला असता जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित यंत्रणेचा हलगर्जीपणा पुढे आल्याचे सांगितले जाते. या कार्यालयाकडून सदर निधीबाबत मागणी नोंदविली गेली नाही, शिवाय पाठपुरावाही केला गेला नाही. त्यामुळे शासनाकडून दहाही नगरपरिषदांसाठी ंआवश्यक असलेला अल्पसंख्यक विकास निधी वितरित झाला नाही. ही गंभीरबाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आता तातडीने प्रस्ताव पाठवून निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींना दिले. हा निधी येण्यास आणखी किती वेळ लागतो, याकडे नगरपरिषदांच्या नजरा लागल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी हा निधी प्राप्त झाल्यास मुस्लीम वस्त्यांमधील अत्यावश्यक विकास कामे तातडीने मार्गी लावणे शक्य असल्याचे एका जागरुक लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) होय, दोन वर्षांपासून निधी आला नाही. प्रस्ताव मंत्रालयात पाठविले आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. अ, ब, क वर्ग नगर परिषदांना अनुक्रमे १५, १० व पाच लाख रुपये निधी वर्षाला अल्पसंख्यक विकासासाठी दिला जातो. - सुदाम धुपे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी, यवतमाळ.अल्पसंख्यक विकास निधी यंदा मिळाला. परंतु जीआर ट्रेस न झाल्याने तो लॅब्स झाला. प्रस्ताव येतील त्याप्रमाणे त्याचा निधीसाठी पाठपुरावा केला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाचा यात कोणताही हलगर्जीपणा असेल असे वाटत नाही. केंद्राचा निधी अनेकदा थेट अल्पसंख्यक शाळांना व नगरपरिषदांना जातो. - नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (नगरविकास) यवतमाळ.